Take a fresh look at your lifestyle.

“त्या” बँकेच्या दरोड्यातील आरोपी फुटेजमध्ये,पण…

 

शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेवर मोठा दरोडा पडला. भरदिवसा रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत बँक कर्मचाऱ्यांना मारहाण करत पाच दरोडेखोरांनी बँकेवर दरोडा टाकून २ कोटी किमतीचे सोने व ३१ लाख रुपयांची रक्कम चोरट्यांनी लंपास केली. या घटनेमुळे शिरूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान या घटनेतील दरोडेखोरांना पकडण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांकडून दहा पथकं तैनात केल्याची माहिती पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दिली.
पिंपरखेड येथे गुरुवार दिनाक २१ ऑक्टोबर दुपारी दिड वाजता तोंड बांधलेले पाच दरोडेखोर हातात रिव्हॉल्व्हर घेऊन महाराष्ट्र बँकेत घुसले. एक जण दरवाजामध्ये थांबला तर चौघे आत केबिनमधे शिरले. त्यांनी मॅनेजर व रोखपाल यांना पिस्तुलचा धाक दाखवीत जीवे मारण्याची धमकी देत लॉकरच्या चाव्या घेतल्या. त्यानंतर तेथील सुमारे दोन कोटी रुपयांचे सोने व 31 लाख रुपये रोख असा दोन कोटी 31 लाख रुपयांचा ऐवज पोत्यात भरून कार गाडीमधून पलायन केले. तसेच या गाडीवर प्रेसचा मोठा बोर्ड लावण्यात आलेला होता. दरोडेखोर सीसीटीव्हीत कैद झाले असून त्यांनी काळे जर्किंग डोक्यापर्यंत पूर्ण व तोंडाला मास्क लावले होते.
अभिनव देशमुख म्हणाले, पिंपरखेड गावातील बँक दरोड्याच्या घटनेचा तपास सुरु आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी या गुन्ह्याच्या तपासासाठी दहा वेगवेगळी पथके तैनात केली आहेत. या गुन्ह्यात वापरण्यात आलेली गाडी काही सीसीटीव्ही मध्ये दिसली आहे. त्या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून देखील तपास सुरू आहे. नगर आणि नाशिक जिल्ह्यातील पोलिसांना देखील या संदर्भात माहिती देण्यात आली असून त्या जिल्ह्यात देखील या आरोपींचा शोध सुरू आहे. लवकरच यातील आरोपींना अटक केले जाईल.
🔶 पहा सी.सी.टीव्ही फुटेज 👇

https://youtu.be/a9lwP75XtVc