Take a fresh look at your lifestyle.

छगन भुजबळांनी केला सोमय्यांवर ‘असा’ हल्लाबोल !

नांदेड : सध्या राज्यात देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजप नेत्यांसह महाविकास आघाडीचे नेतेही देगलूरमध्ये ठाण मांडून आहेत. आज अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची प्रचारसभेत तोफ धडाडली. यावेळी त्यांनी ईडीच्या कारवायांवरूनही भाजपवर हल्लाबोल केला.
यावेळी त्यांनी आपल्या भाषणात शेरोशायरी करत आपल्या खास शैलीत भाजपवर निशाणा साधला. ये वक्त वक्त की बात है, वक्त सबका बदलता है आज तेरा है कल मेरा होगा… अश्या शायराना अंदाजात भुजबळ यांनी ईडी च्या कारवायांबाबत वक्तव्य केले. कितीही कारवाया केल्या तरी मी बदलणार नाही, असेही ते म्हणाले. तसेच यावेळी छगन भुजबळ यांनी येथे सोमय्यांवर देखील टीकेची तोफ डागली.
किरीट सोमय्या नांदेडला कशासाठी येत आहेत?, त्यांनी मुंबईला बसून आरोप करावे, असं म्हणत भाजपच्या नेत्यांनी केलेल्या घोटाळ्यांचं काय झालं ते बघा, असा हल्लाबोल छगन भुजबळ यांनी किरीट सोमय्यांवर केला आहे. तसेच अजित पवारांनी भाजप संबंधित असलेल्या कारखान्याची यादी दिली, तिकडे किरीट सोमय्यांनी जाण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.