Take a fresh look at your lifestyle.

‘गाव तेथे स्मार्ट शाळा’ उपक्रमातून जि.प.शाळांना नवसंजीवनी देणार : आ. निलेश लंके

 

पारनेर : आरोग्य तसेच सर्व सामाजिक प्रश्नांसाठी सदैव कार्यतत्पर असणारे आमदार निलेश लंके यांनी पारनेर-नगर विधानसभा मतदान संघातील जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी आधुनिक पावलं उचलली आहेत. काळानुरूप बदलत्या शिक्षणाची आव्हान व गरज लक्षात घेऊन गाव तेथे स्मार्ट शाळा या उपक्रमाला सुरुवात केली आहे. यासाठी डिजिटल शाळांचे प्रणेते तंत्रस्नेही शिक्षक संदीप गुंड यांनी कमीत कमी खर्चात स्मार्ट शाळा बनवण्याचे तंत्रज्ञान विकसित केले असून लवकरच या तंत्रज्ञानाचा अंमल आमदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर – नगर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक शाळेत करण्यात येणार आहे.

गाव तेथे स्मार्ट शाळा या उपक्रमाची सुरुवात सरपंच राहुल झावरे यांच्या विशेष प्रयत्नाने वनकुटे या गावापासून करण्यात आली.यासाठी निलेश लंके प्रतिष्ठान व दीप फाऊंडेशनच्या वतीने वनकुटे शाळेला इंटरॅक्टिव्ह पॅनल शाळेला भेट देण्यात आले. सदर इंटरॅक्टिव्ह क्लासरुमचे उद्घाटन अहमदनगर जिल्ह्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर व पारनेरचे गटविकास अधिकारी किशोर माने यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी वनकुटेचे सरपंच अॅड राहुल झावरे, पळशीचे सरपंच गणेश मधे,उपसरपंच अप्पासाहेब शिंदे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजूभाऊ डहाळे,उपाध्यक्ष रामभाऊ साळवे,ह.भ.प.नारायण महाराज गागरे,अमोल डुकरे,पवन खामकर, ग्रामसेवक थोरात भाऊसाहेब, रामदास खामकर,वनकुटे केंद्रातील तंत्रस्नेही बिंदकुमार नरड सर व श्री.पांडूरंग भगत ,आनंदा झरेकर मुख्याध्यापक आदर्श शिक्षक सुनिल खामकर,शैलजा झावरे मॅडम,सुलोचना कांबळे,दादाभाऊ नवले व परिसरातील मान्यवर उपस्थित होते.

गाव तेथे स्मार्ट शाळा आमदार निलेश लंके यांच्या या उपक्रमामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या सर्वसामान्य पालकांच्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार या बद्दल शंका नाही. निलेश लंके प्रतिष्ठान व दीप फाऊंडेशने आमची शाळा इंटरॅक्टिव्ह केली त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो . या उपक्रमामुळे शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये एक नवं चैतन्य पाहायला मिळाले व त्यांचा आत्मविश्वास व गुणवत्ता वाढण्यास या तंत्रज्ञानाची निश्चित मदत होईल.
अॅड.राहुल झावरे
सरपंच,वनकुटे
इंटरॅक्टिव्ह पॅनलचा अध्ययन- अध्यापनात प्रभावी वापर कसा करावा याविषयी संदीप गुंड यांनी शिक्षकांना प्रात्यक्षिक दिले. तंत्रज्ञानाच्या अद्भुत दुनियेत संदीप गुंड यांची डिजिटल शिक्षणाची ही नाविन्यपूर्ण संकल्पना खुपच उपयुक्त व प्रेरणादायी असल्याच्या प्रतिक्रिया शिक्षकांनी दिल्या. व आमदार निलेश लंके यांचे आभार व्यक्त केले.

अनेकदा डिजिटल शाळांमध्ये फक्त दृक्श्राव्य स्वरूपाचे डिजिटल शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते ज्यामध्ये शिक्षक विद्यार्थ्यांची आंतरक्रिया नसते. परंतु आम्ही बनविलेल्या इंटरॅक्टिव्ह पॅनल च्या मदतीने आंतरक्रिया असलेले कृतीयुक्त डिजिटल शिक्षण विद्यार्थ्यांना देता येणार आहे. पटसंख्या कमी होणाऱ्या सरकारी शाळांना गाव तेथे स्मार्ट शाळा या उपक्रमातून नवसंजीवनी मिळेल. हा उपक्रम राज्याच्या डिजिटल शिक्षणासाठी दिशादर्शक व प्रेरणादायी ठरणार आहे.
संदीप गुंड
सल्लागार ऑपरेशन डिजिटल बोर्ड, भारत सरकार.