आपल्याकडे लहान मुलांच्या डोळ्यांना दररोज काजळ लावले जाते. काही लोकांचा असा समज आहे की, मुलांच्या डोळ्यांना काजळ लावल्याने त्यांचे डोळे सुंदर आणि मोठे होतात. तसेच डोळ्यांच्या विविध समस्याही दूर होतात. मात्र, डॉक्टरांचे अगदी याउलट मत आहे. डॉक्टर म्हणतात की, लहान मुलांच्या डोळ्यांना काजळ लावणे हानिकारक आहे.
कार्बन हानिकारक : घरगुती काजळ नैसर्गिक घटकांपासून बनवले जाते. त्यामुळे ते मुलांच्या डोळ्यांना लावणे फायदेशीर आहे. मात्र, तज्ज्ञांचे मत आहे की घरगुती काजळ कमर्शियल काजळपेक्षा चांगले असू शकते. मात्र त्यात असणारे कार्बन मुलांसाठी हानिकारकच आहे.
पुरावा नाही : डोळ्यांना काजळ लावल्याने दृष्टी वाढते, असे बोलले जाते. पण याचे काही खास पुरावे नाहीत. तज्ञ याला मिथक मानतात. त्यांचा विश्वास आहे की, जर काजळ लावल्याने दृष्टी वाढत असेल तर ज्या व्यक्तीची दृष्टी कमी आहे त्याला काजळ लावण्याचा सल्ला का दिला जात नाही.
संक्रमणाचा धोका : मुलांचे डोळे अतिशय मऊ असतात. हा विचार करता जेव्हा त्यांना हाताच्या बोटाने काजळ लावले जाते. त्यावेळी संक्रमणाचा धोका वाढतो. याशिवाय अनेक वेळा आंघोळ करताना काजळ मुलांच्या डोळ्यामध्ये आणि नाकामध्ये जाऊ शकते.
खाज सुटू शकते : रोज लावलेले काजळ बऱ्याच वेळ डोळ्यांवर राहिल्याने खाज सुटण्याची शक्यता अधिक आहे. याशिवाय जर तुम्ही बाजारातील काजळ वापरत असाल तर ते आणखी धोकादायक आहे. कारण त्यात लेड आढळतात. जे मुलांच्या मेंदूच्या विकासावरही विपरित परिणाम करू शकतात.