Take a fresh look at your lifestyle.

यमदंड म्हणजे काय?

यातून कुणाचीही सुटका नाही.

आपण केलेल्या कर्माचा भोग आपल्याला भोगावाच लागतो.पण मनुष्याला असं वाटतच नाही की आपल्याला हे भोगावं लागणार आहे. जसं त्रिगुणानी आपण व्याप्त आहोत.रज,तम आणि सत्वगुणांनी कर्मगती प्राप्त होते.आपण कोणत्या गुणाचा विकास करायचा याचं स्वातंत्र्य मात्र आपणास आहे.त्यानुसार त्रिविधतापांचा प्रभाव तयार होतो.आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक असे त्रिविधताप आहेत.पैकी आदिदैविक तापाने मनुष्याला यमदंड भोगावा लागलो.पापाचरण हे त्याचं मुख्य द्वार आहे.
तुकोबाराय म्हणतात, विषयाचे सुख येथ वाटे गोड।पुढे अवघड यमदंड।।मारीती तोडिती झोडिती निष्ठुर।यमाचे किंकर बहुसाल।।
विषय हाच पापाचरणाचा प्रवेश आहे. अगदी कुटुंबापासुनच याची सुरुवात आहे. त्यात आईवडिलांचे हाल करणं,कुटुंबावर यथायोग्य संस्कार न करणं,मुलांना वाममार्ग शिकवणे,गोरगरिबांना त्रास देणे,लुटून धन कमावणे अशा अनेक गोष्टी त्यात येतात.याचा पुढे भोग भोगावाच लागतो.पण विषयसुख हे सगळं आठवुच देत नाही,हे अगदी खरं आहे.ते अत्यंत गोड वाटतं.माणसं म्हणतात मनुष्य जन्म पुन्हा आहे का?मग घ्या मजा मारुन.
पण महाराज म्हणतात पुढे अवघड यमदंड.
आपल्याला असं वाटतं की कुणी पाहिलाय यम?कशाच काय!अशी कोणतीही यंत्रणा नाही. असं म्हणून आपण बिनधास्त पापाचरण करत रहातो.पण हा यमदंड अनेक मार्गाने येतो.शारीरिक व्याधी हे त्याचं येणं आहे. मग कितीही धन खर्च केले तरी शरीर त्यातुन सुटत नाही. या आदिदैविक तापापासुन वाचता आले पाहिजे.मिळालेलं जीवन आनंदात निरोपाकडे गेलं पाहिजे.
 हसत हसत निरोप घेता आला तर जीवनाचे सार्थक झाले. आपली मुक्ती कावळ्यावर सोपवण्यात काय अर्थ आहे? सत्वगुणांचा विकास करता आला तर पापाचरण घडणे थांबते.आध्यात्मिक गुणांचा विकास हाच तो एकमेव मार्ग आहे.
रामकृष्णहरी

रामकृष्णहरी.