Take a fresh look at your lifestyle.

पारनेरकरांसाठी आज मोठी गुड न्यूज !

कोरोना रुग्णसंख्या आली बोटावर मोजण्याइतपतच.

पारनेर : पारनेरकरांसाठी आज आनंदाची बातमी आहे… पारनेर तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या आज झपाट्याने घसरली. कोरोना रुग्णसंख्येचा आजचा आकडा अवघा चार एवढाच राहिला. त्यामुळे तालुक्यातून कोरोना निरोप घेत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. गेल्या दीड वर्षातला हा सर्वात निचांकी आकडा आहे.

संपूर्ण राज्यभर कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना पारनेर तालुक्यात मात्र ही संख्या कमी होण्याचे नाव घेत नव्हती. प्रशासनाने विविध उपाययोजना करूनही त्यामध्ये फरक पडत नव्हता. रोज जवळपास पन्नास ते शंभर रुग्ण सापडत होते. त्यामुळे अनेक गावे चिंताग्रस्त झाली होती. जवळपास वर्षभर जिल्ह्यात पारनेर तालुका कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत आघाडीवर होता. अनेक वेळी अनेक गावांमध्ये लॉकडाऊन करण्याची आपत्ती प्रशासनावर ओढवली. त्यामुळे विनाकारण नागरिकांचा रोष ओढवून घ्यावा लागला.

राज्यातील अनेक ठिकाणची कोरोना सेंटर बंद होत असताना पारनेर तालुक्यातील कोरोना सेंटर अधिक काळ चालू ठेवावे लागले. आज मात्र, ही संख्या कमालीची घसरल्याने संपूर्ण तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे. तरी नागरिकांनी कोरोना कमी होत असताना शासनाने ठरवून दिलेले नियम पाळावेत. सर्वांनी मास्क वापरावेत तसेच सार्वजनिक ठिकाणी आणि इतर कार्यक्रमाच्या निमित्ताने गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे अजून थोडे दिवस नागरिकांनी गरज नसताना घराबाहेर पडण्याचे टाळावे, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
सध्या सणासुदीचे दिवस असून या दिवसात नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य खात्याच्या वतीने करण्यात आले आहे.
नगर शहरासह जिल्ह्यातील इतर तालुक्यांचा कोरोना आकडाही अवघा 25 च्या आत आल्यामुळे संपूर्ण जिल्हा लवकरच कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे आशादायक चित्र निर्माण झाले आहे.आज जिल्ह्यात जामखेड तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या शून्यावर आली आहे तर पाथर्डी तालुक्यात अवघा एकच रुग्ण सापडला आहे.