Take a fresh look at your lifestyle.

अनाधिकृत बांधकामावर विकास प्राधिकरणचा हातोडा !

पोलिस बंदोबस्तात धडक कारवाई.

शिरुर : शिरूर तालुक्यातील कारेगाव येथील बांधलेल्या चार अनधिकृत बांधकामावर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए)अनधिकृत बांधकाम निष्कासन विभागामार्फत धडक कारवाई करण्यात आली.या कारवाईत दहा हजार चौरस फुटांची चार बांधकामे पाडण्यात आली.
कारेगाव येथील गट क्रमांक २८४ आणि २९८ मध्ये ही कारवाई करण्यात आली. त्यासाठी पाच पोकलेनचा वापर करण्यात आला. बांधकाम निष्कासन कारवाईच्या वेळी पीएमआरडीएचे अधिकारी पोलिस उपायुक्त निलेश अष्टेकर, उपजिल्हाधिकारी मोनिका सिंह आणि पोलिस कर्मचारी उपस्थित होते.
पीएमआरडीए कार्यक्षेत्रात बांधकाम करणाऱ्या व्यक्तींनी संबंधित अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय बांधकाम करू नये. तसेच नागरिकांनीही बांधकामासाठी सर्व परवानगी घेतल्याची खातरजमा करूनच सदनिका विकत घ्यावी, असे आवाहन पीएमआरडीएच्या उपजिल्हाधिकारी मोनिका सिंह यांनी केले आहे.
यापूर्वीही १४ ऑक्टोबर रोजी पीएमआरडीएकडून हवेली तालुक्यातील वाघोली येथील गट क्रमांक ३६५ मध्ये बांधलेल्या अनधिकृत रो हाऊसेसवर कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी चार पोकलेनचा वापर करून चौदा बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली होती.