अहमदनगर : रंगमुद्रा युवा प्रतिष्ठान वडगाव गुप्ता आणि राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक विभाग यांच्या वतीने कोरोना योद्धा पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये डॉ.देवदान कळकुंबे, शशिकांत नजान, नितीन मुरकुटे स्वप्नील कुऱ्हे, सादिक पठाण यांचा समावेश आहे.
कोरोना जागतिक महामारीच्या काळात पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत जेव्हा रक्ताचे नातेवाईक देखील जवळ येत नव्हते आशा वेळी जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांची सेवा केली.
त्यांनी परप्रांतीय नागरिकांना भोजन व्यवस्था,किराणा किट वाटाप ,ऑक्सिजन पुरवठा,हॉस्पिटल मध्ये दाखल करणे, अलगिकरण, विलगीकरन साठी मदत,अत्यावश्यक औषधोपचारासाठी मदत,लसीकरण, कोरोना चाचणी पासून ते कोरोनामुळे मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कार अशा विविध स्तरावर कार्य केले.
त्यांच्या अतुलनीय कार्याची दखल घेत त्यांचा गौरव व्हावा यासाठी रंगमुद्रा युवा प्रतिष्ठान वडगाव गुप्ता आणि राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक सेल यांच्या वतीने कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
शशिकांत नजान ( अहमदनगर महानगरपालिका कोरोना दक्षता पथक सनियंत्रण अधिकारी ) कॅप्टन देवदान कळकुंबे, नितिन मुरकुटे ( कोव्हीड सेंटर भाळवणी ), स्वप्नील कुऱ्हे, सादिक पठाण हे या पुरस्काराचे मानकरी आहेत.
शनिवार दि. २३ रोजी वडगाव येथे संपन्न होणाऱ्या कलाकार विमा वाटप कार्यक्रमात. नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आ. निलेश लंके, आ.संग्राम जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, चित्रपट अभिनेते प्रकाश धोत्रे, यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
रंगमुद्रा युवा प्रतिष्ठान ही संस्था नाट्य क्षेत्रात कार्यरत असून नाटकातून मिळणाऱ्या पैशाचा वापर सामाजिक कार्यासाठी केला जातो. यामध्ये लसीकरण, मोफत गणवेश, पाठ्य पुस्तके, वृक्षारोपण आशा विविध कार्यक्रमाचा समावेश आहे असे रंगमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय घाडगे यांनी सांगितले.
कोरोना काळात दोन वर्षापासून सांस्कृतीक कार्यक्रम बंद असल्याने सर्वच क्षेत्रातील कलाकार अडचणीत सापडले आहेत. आता लॉकडाऊन उघडलेली पुन्हा कार्यक्रम सुरू होणार आहे त्यामुळे जिल्ह्यातील कलाकारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने २०० कलाकारांचा प्रत्येकी दहा लाख रुपयांचा अपघात विमा करत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक सेलचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब डोंगरे यांनी सांगितले.
विमा वितरण कार्यक्रमाच्या सुरुवातीस सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे, राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. श्याम शिंदे, वडगाव गुप्ताचे सरपंच विजय शेवाळे, माजी सरपंच भानुदास सातपुते, नवनागापूर चे सरपंच डॉ. बबनराव डोंगरे, जिल्हा नाट्य संघाचे अध्यक्ष शिवाजीराव घाडगे, उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक सेलचे जिल्हा सरचिटणीस रियाज पठाण यांनी केले आहे.