Take a fresh look at your lifestyle.

“जत्रेत खेळणाऱ्यांनी तालमीतल्या पैलवानांचा नाद करू नये !”

अजित पवारांच्या समर्थनार्थ पुण्यात झळकले बॅनर !

0

पुणे : राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संबंधित साखर कारखान्यांवर आयकर विभागाच्या धाडी तसेच त्यांच्या बहिणींच्या घरीही आयकर विभागाने केलेली कारवाई..! तपास यंत्रणांनी अजित पवारांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलेच पेटले आहेत. अजित पवार समर्थकांनी पुण्यात बॅनरबाजी केली असून जत्रेत खेळणाऱ्यांनी तालमीतल्या पैलवानांचा नाद करू नये असे यामध्ये म्हटले आहे. असा आशय बॅनरवर लिहिण्यात आलेला आहे. साहजिक त्यांचा रोख आहे तो भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याकडेच ! 

अजित पवार सध्या आयकर विभागाच्या कारवायांनी दुखावले आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी भावनिक होत, ‘माझ्यावर काय कारवाई करायची ती करा, छापेमारी करा, पण अजितदादांच्या बहिणी म्हणून कारवाई होत असेल तर ते बरोबर नाही’, असे म्हटले आहे. दादा भावनिक झालेत, हे कार्यकर्त्यांनी ओळखले.
उपमुख्यमंत्री अजित पवारांचा शुक्रवार-शनिवारी पुण्यात दौरा होता. लागलीच पुण्यातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांच्या समर्थनार्थ मोठी रॅली काढून दादांचे स्वागत केले. आता रॅलीला 10 दिवसही पूर्ण होत नाही तोपर्यंत आता पुण्यातील दक्षिण भागांत अजितदादांच्या समर्थनार्थ बॅनर्स लागलेत. कात्रज, भारती विद्यापीठ परिसरात हे बॅनर्स लागले आहेत.
साहजिक राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या निशाण्यावर किरीट सोमय्या आहेत. म्हणूनच अजित पवार यांच्या समर्थनार्थ पुण्यातल्या विविध भागांत बॅनरबाजी केली जातीय. अजित पवार ज्या ज्या वेळी पुण्यात येतील त्या त्या वेळी मोठं शक्तीप्रदर्शन केले जाते. अजित पवारांचे खास पद्धतीने स्वागत केले जाते. अजितदादांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी होतीय, त्यातून कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांना एकच संदेश द्यायचाय, ‘दादा तुम्ही एकटे नाहीत…!, अशी चर्चा पुण्यातील राजकीय वर्तुळात होत आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.