Take a fresh look at your lifestyle.

जेसीबी हे नाव कसे पडले? त्यामागचा इतिहास काय? 

ट्रेडमार्क रजिस्टर करण्यासाठी लागले तब्बल ६५ वर्ष !

 

हल्ली रस्त्यावर खड्डे खोदण्यापासून ते खड्ड्यातील माती ट्रकमध्ये लोड करण्यापर्यंत जेसीबीची मदत घ्यावी लागते. पिवळ्या रंगातील हे मशीन त्याच्या अवाढव्य पंजाने दगड, माती, अवजड सामान अगदी सहज उचलते. मात्र या मशीनला ‘जेसीबी’ हे नवा कसे पडले? याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.
जेसीबीचा अर्थ ‘जोसेफ सिरील बामफोर्ड’ असा आहे. ‘जे. सी. बामफोर्ड एक्सावेटर्स लिमिटेड’ ही कंपनी ‘जेसीबी’ नावाने मशीन विकते. ही जगातील पहिली अशी मशीन आहे जिला नावचं नाव नाही. त्यामुळे मशीनवर दिसणारा कंपनीचा लोगोचं मशीनची ओळख बनलाय. खोदकाम करणाऱ्या या मशीनला ‘जेसीबी’ चं म्हटलं जातंय.
जेसीबी पूर्णपणे मशीनचं नव्हे तर त्यात असणाऱ्या इंजिनचं नाव आहे. १९४५ साली जोसेफ सिरील बामफोर्ड यांनी या इंजिनचा शोध लावला होता. त्यावेळी या इंजिनला नाव काय द्यायचं? याबद्दल विचार करूनही एक ठराविक नाव मिळालं नाही. अखेर जोसेफ यांच्या पूर्ण नावाचं संक्षिप्त रूप या इंजिनला आणि मशीनला देण्यात आलं.
‘जेसीबीचं’ ही पहिली खासगी ब्रिटीश कंपनी आहे जिने पहिल्यांदा भारतात कारखाना उभारला. आजच्या घडीला भारतात उत्खानानासारख्या कामासाठी सर्वात जास्त मागणी जेसीबीचीच आहे. जेसीबी हा जगात पहिलाच असा ब्रँड आहे ज्याचा ट्रेडमार्क रजिस्टर करण्यासाठी तब्बल ६५ वर्ष लागली. २००९ साली जेसीबीचा ट्रेडमार्क रजिस्टर झाला. कंपनीने मशीनला दिलेला रंग हा १९४५ पासून पिवळाच आहे.