Take a fresh look at your lifestyle.

📌आजचे 12 राशींचे राशिभविष्य

🔸22 ऑक्टोबर 2021 

 

▪️मेष : आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा. फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. स्वत:साठी काही वेळ काढावा. सकारात्मक गोष्टी आठवून पहा.
▪️वृषभ : संपूर्ण दिवस धामधुमीत जाईल. कामाची अतिरिक्त जबाबदारी अंगावर पडू शकते. जमिनीची कामे सुरळीत पार पडतील.
▪️मिथुन : रोजगाराची नवीन संधी प्राप्त होईल. हातातील वेळेचा सदुपयोग करा. व्यापारी वर्गाला नवीन करार लाभदायक ठरतील.
▪️कर्क : हातातील कलेला वेळ द्यावा. घरात लोकांची उठ बस राहील. वडीलधार्‍यांचे मत ग्राह्य मानावे लागेल.
▪️सिंह : बोलण्यात संभ्रम येऊ देऊ नका. कौटुंबिक सौख्य जपावे. आपल्या अधिकाराची जाणीव ठेवा. व्यापारी वर्गाने संधी सोडू नये.
▪️कन्या : घरातील वातावरण उत्साही ठेवा. जबाबदारी योग्य रीतीने पार पाडा. कौटुंबिक खर्च नियंत्रणात ठेवा. प्रिय व्यक्तीची गाठ पडेल.
▪️तूळ : विद्यार्थ्यानी केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. विवाहाची बोलणी पुढे सरकतील. मिळकतीचे नवीन स्त्रोत उपलब्ध होतील.
▪️वृश्चिक : काही गोष्टींचे मनन चिंतन करावे. मित्रांचे योग्य वेळी सहकार्य लाभेल. भागीदारीतून लाभ शक्य होईल. एकांतात काही काळ घालवावा.
▪️धनु : तरुण वर्गाच्या सहवासात रमाल. महत्त्वाची कामे तूर्तास टाळावीत. जुने ग्रंथ वाचनात येतील. आध्यात्मिक क्षेत्रात तल्लीन होऊन जाल.
▪️मकर : मदतीचा आनंद मिळवाल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. तुमच्या मताला मान मिळेल. पत्नीच्या सहकार्याने कामे कराल.
▪️कुंभ : मनातील साशंकता काढून टाका. प्रगतीच्या दृष्टीने नवीन पाऊल उचलले जाईल. बोलताना संभ्रमीत होऊ नका. व्यापार्‍यांना नवीन दिशा सापडेल.
▪️मीन : जोडीदाराची इच्छा प्रमाण मानाल. हातातील चांगली संधी सोडू नका. भागीदारीत फार विसंबून राहू नका. मुलांशी वाद संभवतात.