पुन्हा ठरलचं ! शिक्षक बँकेची निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार !
गुरुमाऊली मंडळाच्या आमसभेत बापूसाहेब तांबे यांची घोषणा !
अहमदनगर : जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची येऊ घातलेली निवडणूक पूर्णपणे स्वबळावर आणि पूर्ण ताकदीने आपण लढणार असून बँकेमध्ये केलेल्या चांगल्या कामामुळे आपल्या मंडळाला निश्चितपणे यश मिळणार आहे.कार्यकर्त्यांनी मंडळाने केलेले चांगले काम आणि सभासदाभिमुख राबविलेले धोरण या जोरावर बँकेच्या आगामी निवडणुकीसाठी सज्ज व्हावे असे आवाहन गुरुमाऊली मंडळाचे नेते बापूसाहेब तांबे यांनी केले.
अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या मागील महिन्यात घडलेल्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर गुरुमाऊली मंडळाची जिल्ह्याची आमसभा कोतुळ तालुका अकोले येथे मोठ्या उत्साहात पार पडली . त्यावेळी सभेला मार्गदर्शन करताना तांबे बोलत होते.अध्यक्षस्थानी ज्येष्ठ मार्गदर्शक मोहनराव पागिरे होते .व्यासपीठावर राज्य संघाचे उपाध्यक्ष दत्ता पाटील कुलट, जिल्हा गुरुमाऊली मंडळाचे अध्यक्ष राजकुमार साळवे, उच्चाधिकार समितीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल फुंदे, शिक्षक संघाचे कार्यकारी अध्यक्ष गोकुळ कळमकर, कार्याध्यक्ष राजेंद्र सदगीर, जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्ष अंजली मुळे, राज्य संघाच्या सदस्य आणि बँकेच्या माजी व्हाईस चेअरमन विद्युलता आढाव, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष रामचंद्र गजभार , तंत्र व शिक्षणसेवा मंडळाचे अध्यक्ष जयेश गायकवाड ,पदवीधर शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष राम वाकचौरे,जिल्हा सरचिटणीस मनोजकुमार सोनवणे, शिक्षक बँकेचे व्हाईस चेअरमन गंगाराम गोडे, माजी चेअरमन राजेंद्र रहाणे, सलीमखान पठाण, साहेबराव अनाप, संतोष दुसुंगे, शरदभाऊ सुद्रिक, माजी व्हाईस चेअरमन बाळासाहेब मुखेकर , अर्जून शिरसाट ,बाबासाहेब खरात, संचालक किसनराव खेमनर, सुयोग पवार तसेच जिल्हा पदाधिकारी सर्वश्री रामेश्वर चोपडे, साहेबराव टपळे,बाळासाहेब तापकीर, बाळासाहेब सरोदे, मच्छिंद्र लोखंडे, विजय नरवडे, किशोर माकोडे , अनिल टकले, अशोक गिरी , संतोष राऊत, किसन वराट. बाळासाहेब जऱ्हाड व जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघ व गुरुवारी मंडळाचे तालुका अध्यक्ष व इतर प्रमुख पदाधिकारी
उपस्थित होते.
यावेळी शिक्षक बँकेच्या चेअरमन निवडीच्या वेळी झालेल्या गोंधळाबाबत सखोल चर्चा करण्यात आली. परंतु 14 संचालक बरोबर आहेत व सर्व संचालकांनी पदाचे राजीनामे दिले आहेत. जिल्हा श्रेष्ठी जो निर्णय घेतील ,तो सर्व संचालकाला मान्य असल्यामुळे व गेल्या साडे पाच वर्षात या सर्व संचालक मंडळाने अतिशय चांगला, सभासद हिताचा, पारदर्शी कारभार केलेला आहे .ज्यांनी चेअरमन निवडीत गडबड केली,त्यांना योग्यवेळी त्यांची जागा दाखवून देऊ. त्यांच्यावर कारवाई करू, आगामी शिक्षक बँकेच्या निवडणुकीला एक दिलाने सामोरे जाण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
शिक्षक बँकेची निवडणूक घेण्यासाठी न्यायालयात गेलेल्या विरोधी मंडळांने सत्तेसाठी आपण सत्तेसाठी किती हापापलो आहोत, व्याकुळ झालो आहोत,हे या चेअरमन निवडीच्या वेळी केलेल्या गोंधळावरून सिद्ध होते.
आपकी अपनी ऑनलाइन दुकान खोलना अब हो गया है बहुत ही आसान और सस्ता भी। सिर्फ़ ४९९ रुपए में आप अपने ख़्वाबोंको हक़ीक़त में बदल सकते हैं। आज ही www.apptmart.com पे रेजिस्टर कीजिये और एक क़दम सफलता की ओर उठायिये। अधिक जानकारी के लिए आज ही सम्पर्क करें +91 70286 32421