Take a fresh look at your lifestyle.

जवळ्यातील पिडितेच्या घटनेचा तपास करून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी !

तालुका भाजपाकडून तहसीलदार ,पोलिस स्टेशनला निवेदन.

पारनेर : तालुक्यातील जवळा येथील दहावी इयत्तेत शिकणाऱ्या मुलीचा काल दुपारी संशयास्पद मृत्यू झाला.या घटनेचा योग्य तपास लावून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी पारनेर तालुका भाजपाच्या वतीने तहसीलदार व पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले.

राज्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे व उल्हासनगर व मुंबई येथील साकीनाका येथे महिलांवर अत्याचारच्या घटना घडल्या आहेत.याचाच अर्थ राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली असून महाविकास आघाडी सरकार फक्त खंडणी गोळा करण्याचे काम करत आहे.महाराष्ट्रातील महिला व मुली या असुरक्षित असून भारतीय जनता पार्टी या सरकारचा निषेध करत आहे व आरोपींना जबर वचक बसविण्यासाठी सरकारने योग्य पावले उचलावीत अन्यथा रस्त्यावर उतरून सरकारविरोधात आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असा इशाराही यावेळी देण्यात आला.
याप्रसंगी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अश्विनीताई थोरात, तालुकाध्यक्ष वसंत चेडे , तालुका महिला अध्यक्षा उषा जाधव, सोशल मीडिया प्रमुख ऐश्वर्या रेपाळे, शहर अध्यक्षा अनुराधा पवळे,तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब हरिभाऊ चेडे, पारनेर शहराध्यक्ष किरण कोकाटे , युवती सायली रेपाळे ,तालुका सरचिटणीस सागर मैड ,जिल्हा उपाध्यक्ष सुभाष दुधाडे , संभाजी आमले, पोपट लोंढे, दीपक, भागवत, कुशाहरी भांड व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
पारनेर तालुक्यात घडलेली घटना ही निंदनीय असून तालुक्यात गुन्हेगारी वाढत आहे.महिला या दिवसाढवळ्या सुरक्षित नसून आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा होईल याकडे शासनाने लक्ष द्यावे.
▪️उषा जाधव.
तालुकाध्यक्षा, भाजपा महिला आघाडी.
पोलिसांनी या घटनेचा योग्य पद्धतीने तपास करावा.यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत व पुन्हा अशा घटना घडणार नाहीत याकडे पोलीस यंत्रणेने लक्ष द्यावे तसेच लवकरात लवकर या घटनेचा तपास लावावा.
▪️अश्विनीताई थोरात
जिल्हाध्यक्षा,भाजपा महिला आघाडी.