Take a fresh look at your lifestyle.

…आणि त्याने मित्राला गिफ्ट केलं ७५ तोळे सोनं !

अन् पोलिसही चक्रावले!

 

केरळातल्या तिरुवनंतरपुरममध्ये एक असा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ज्याबद्दल जाणून पोलिसही चक्रावले आहेत. सविस्तर असे कि, एका दहावीत शिकणाऱ्या मुलीने आपल्या सोशल मीडियावरच्या मित्राला तब्बल ३७ लाख रुपयांचं सोनं गिफ्ट म्हणून दिलं. एकूण ७५ तोळे सोनं तिने तिच्या मित्राला दिलं.

एका वर्षापूर्वी शिबीन नावाच्या एका व्यक्तीने सोशल मीडियावर पोस्ट केली की, तो सध्या आर्थिक संकटात आहे. ही पोस्ट पाहून १५ वर्षीय विद्यार्थिनीने त्याच्याशी बोलायला सुरुवात केली आणि त्यातून हे दोघे जवळ आले. शिबीनला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी तिने हे पाऊल उचलल्याचं समोर येत आहे.

जेव्हा सोनं गायब झाल्याचे समजले तेव्हा या मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर शिबीन आणि त्याची आई शाजिलाला अटक करण्यात आली. त्यावेळी या मुलीने घडला प्रकार उघड केला आणि आपणच सोनं दिल्याचं कबूल केलं. यानंतर तपास केला असता पोलिसांना शिबीनच्या घरात साधारण १० लाख रुपये सापडले आहेत.

हे सगळं सुरु असताना मात्र खरा ट्विस्ट तेव्हा आला की, जेव्हा शिबीनने पोलिसांना सांगितलं की त्याला ७५ तोळे सोनं मिळालंच नाही. या मुलीने त्याला केवळ २७ तोळे सोनं दिलं. यामुळे पोलिसही गोंधळलेले आहेत. या विद्यार्थिनीने पोलिसांना सांगितलं की, एकूण ७५ तोळ्यांपैकी ४० तोळे सोनं तिने पलक्कड जिल्ह्यातल्या दुसऱ्या एका तरुणाला दिलं, ज्याच्याशी तिची ओळख इन्स्टाग्रामद्वारे झाली होती. पुढे या युवकाने सोनं मिळताच या मुलीला ब्लॉक केलं, असंही ती म्हणाली. मात्र या सगळ्या प्रकारावर पोलीस आता विश्वास ठेवायला तयार नाहीत.