Take a fresh look at your lifestyle.

आपल्या नात्यातील प्रेम जपताना…

 

नात्यातील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नपूर्वक काही गोष्टी करायला हव्या. अनेकदा पुरूष स्वतःला मोकळेपणे व्यक्त करत नाहीत. त्यामुळे स्त्रियांनी काही गोष्टी करून नात्यातील वीण टिकवून ताठेवणे गरजेचे आहे. तुमच्या नात्यातील प्रेम जपताना खालील काही गोष्टी तुम्हाला नक्की मदत करतील…
● रोजच्यापेक्षा थोडे आधी उठा. ब्रश करा आणि त्यांना उठवून प्रेमाने गुड मॉर्निंग म्हणा.
● ते कामाला जात असताना त्यांना आवडेल असे काही तरी करा.
● ते थकलेला असतील तर त्यांच्या पायांना आरामदायी फूट मसाज करा.
● ‘मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं..’ असे म्हणून त्यांना कमी लेखणारे उद्गार काढू नका.
● त्यांच्या आवडीचा एखादा सुविचार कागदावर लिहून तो कागद त्याच्या डायरीत ठेवा.

● वेगवेगळ्या कागदावर त्यांच्या आवडीच्या गोष्टी लिहायला सांगा. या सर्व चिट्ठ्या एकत्र करून एक-एक उघडून वाचा.
● कधीतरी अचानकपणे त्यांना रोमँटिक डेटसाठी घेऊन जा.
● जेव्हा बाहेर जेवायला झाला तेव्हा अगदीर सहजपणे पेन घेऊन पेपर नॅपकिनवर तुमचा रात्रीचा प्लॅन लिहा. पेपर नॅपकिनची घडी करून त्यांच्यासमोर ठेवा.