Take a fresh look at your lifestyle.

गुड न्यूज ! गॅस सिलेंडरच्या बुकींवर मिळणार ‘ एवढया’ रुपयांचा कॅशबॅक !

 'अशी' बुकींग करून घ्या फायदा

 

नवी दिल्ली: एलपीजी सिलेंडरच्या सातत्यानं वाढ होत असतानाच आता सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. घरगुती सिलेंडरच्या बुकींगवर आता तुम्हाला 2700 रुपयांचा कॅशबॅक मिळण्याची संधी आहे. ऑनलाईन पेमेंट अॅप ‘पेटीएम’ (Paytm)नं याची सुरुवात केली आहे. 3 सिलेंडरची बुकींग केल्यास तुम्हाला हा कॅशबॅक मिळू शकतो. पेटीएमनं अॅपवर एका बॅनरच्या माध्यमातून या ऑफरची घोषणा केली आहे.
यामध्ये एचपी, इंडेन किंवा भारतगॅस यापैकी कोणत्याही कंपनीचा सिलेंडर बुक केल्यास तुम्हाला 2700 रुपयांचा कॅशबॅक मिळण्याची संधी आहे. ही ऑफर नेमकी केव्हापर्यंत वैध आहे हे मात्र स्पष्ट होऊ शकलेलं नाही. पण, तुम्ही पेटीएमचे युजर असल्यास या ऑफरचा फायदा घेऊ शकता.
▪️ कशी करता येईल बुकींग?
या सवलतीचा फायदा घेण्यासाठी सर्वप्रथन मोबाईलमध्ये Paytm App डाऊनलोड करा. यानंतर ज्या कंपनीचा गॅस बुक करायचा तो करा. यासाठी Paytm App मध्ये Show More मध्ये जाऊन क्लिक करत पुढे रिचार्ज आणि पे बिल्स असे पर्याय निवडा. यानंतर तुम्हाला Book a Cylinder हा पर्याय दिसेल. इथं जाऊन गॅस पुरवठा करणारी कंपनी निवडा. LPG Id  किंवा तुमचा युजर क्रमांक तिथे टाईप करून प्रोसिडवर क्लिक करा.
या नंतर तुमच्या समोर सर्व माहिती येईल. बुकींग केल्यानंतर 24 तासांच्या आत तुम्हाला कॅशबॅक स्क्रॅचकार्ड मिळेल. ज्याचा वापर तुम्हाला सात दिवसांच्या आत करायचा आहे.