Take a fresh look at your lifestyle.

“गाव जेवण एक दिवस देणार की पुढची तीन वर्ष देणार ?”

चंद्रकांत पाटलांच्या 'ऑफर'ला अशोक चव्हाणांचा टोला.

मुंबई : काँग्रेस नेते रावसाहेब अंतापूरकर यांचे काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे निधन झाले. ते नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार होते. त्यांच्या निधनानंतर देगलूर-बिलोली मतदारसंघाची जागा सध्या रिक्त आहे. त्यामुळे आता या जागी पोटनिवडणूक होत आहे. देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. कारण भाजपसह महाविकास आघाडीचे नेते प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत.

देगलूर-बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी मतदारांनाअनोखी ऑफर दिली आहे. भाजपला आघाडी देणाऱ्या गावांना माझ्यातर्फे गावजेवण देणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
या गाव जेवणात आपण स्वतः सहभागी होणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले. चंद्रकांत पाटलांच्या या ऑफरवर काँग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाणांनी प्रतिक्रिया दिली आहे.जेवण एक दिवस देणार आहात की उर्वरीत तीन वर्षे? असा सवाल चंद्रकांत पाटलांना केलाय. तसेच त्यांच्या हातात काही नसल्याचा टोलाही अशोक चव्हाण यांनी लगावला आहे.

▪️’अशी’ दिली चंद्रकांत पाटलांनी ऑफर !
देगलूर-बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपला आघाडी द्या, मी तु्हाला गाव जेवण देईन, अशी खुली ऑफरच चंद्रकांत पाटील यांनी देगलूरच्या कार्यकर्त्यांना दिली आहे. देगलूर-बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणूकीसाठी आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी ही अनोखी ऑफर दिली. भाजपला आघाडी देणाऱ्या गावांना माझ्यातर्फे गावजेवण देणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. विशेष म्हणजे या गाव जेवणात आपण स्वतः सहभागी होणार असल्याचे पाटील यांनी जाहीर केले. पाटील यांच्या गाव जेवणाच्या ऑफरमुळे ते चांगलेच चर्चेत येण्याची शक्यता आहे. तसेच सध्या देगलूर-बिलोली विधानसभेत पाटील यांच्या ऑफरची चांगलीच चर्चा रंगली आहे.