Take a fresh look at your lifestyle.

आमदार अशोक पवारांना धमकी देणाऱ्यांचा शोध घेवून कारवाई करा !

 

शिरूर : विचारांची लढाई ही विचारांनीच लढली गेली पाहिजे, परंतु समाजातील काही विघातक प्रवृत्ती शिरूर शहरातील सामंजस्याचे वातावरण जाणून बुजून बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा लोकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिरूर तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बापूसाहेब शिवले यांनी केली आहे.
आमदार अशोक पवार यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना दोन दिवसापूर्वी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली या घटनेचा शेतकरी संघटनेच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला आहे असे सांगून श्री. शिवले म्हणाले, शिरूर तालुक्याला सामंजस्याची आणि सलोख्याची खूप मोठी परंपरा आहे. यापूर्वीच्या अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या कृतीतून हे दाखवून दिले आहे. स्वर्गीय माजी आमदार बाबुराव दौंडकर,रावसाहेब दादा पवार, बापूसाहेब थिटे यांच्यापासून ते थेट आताच्या नेत्यांपर्यंत सर्वांनीच सर्वसमावेशक राजकारण करीत राजकारणात समाजातील वातावरण दूषित होईल असा चुकीचा पायंडा कधीच पडला नाही.
तालुक्याचे राजकीय वातावरण यापूर्वी एवढे दूषित आणि गढूळ कधीच झाले नव्हते. विचारांची लढाई ही नेहमी विचारानेच लढली गेली पाहिजे मतभेद जरूर असावेत परंतु मनभेद असता कामा नये. आणि वैयक्तिक पातळीवर तर ते बिलकुल दिसता कामा नये.
आमच्या पश्‍चिम महाराष्ट्राचे शेतकरी संघटनेचे नेते बाळासाहेब घाडगे, जिल्ह्याचे नेते सुहास काटे, तालुका पातळीवरील पदाधिकारी भुजबळ, बाबासाहेब थिटे ,भागिनाथ फंड यांच्यासह लवकरच जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांची भेट घेणार असल्याची माहिती शिवले यांनी यावेळी दिली.