Take a fresh look at your lifestyle.

पेट्रोल-डिझेल दरवाढीने केला उच्चांक !

जाणून घ्या, तुमच्या भागातील इंधनाचे दर.

पुणे : पेट्रोल-डिझेलचे दर आज (बुधवार) पुन्हा एकदा वाढले असून, दरवाढीचा हा उच्चांक आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 35 पैशांची वाढ केली आहे. केवळ ऑक्टोबर महिन्यात इंधन दर 4.50 रुपयांहून अधिकची वाढ झाली आहे.
IOCL च्या आज जारी झालेल्या रेटनुसार, दिल्लीत इंडियन ऑइल पंपवर पेट्रोल 106.19 रुपये प्रति लीटर विक्री होत आहे. तर डिझेल दर 94.92 रुपये प्रति लीटरपर्यंत पोहोचले आहे. ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत 15 वेळा इंधन दरवाढ झाली आहे. केवळ तीन दिवस सोडून दररोज पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. केवळ ऑक्टोबर महिन्यात पेट्रोल 4.45 रुपये महागले आहे. तर डिझेल 5 रुपयांनी वाढले आहे. कच्च्या तेलाच्या दरात तेजी आहे, त्यामुळे पेट्रोल-डिझेल दरवाढ कायम आहे. दरम्यान, इंधनाच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठी झळ बसत आहे.
>> दिल्लीत पेट्रोल 106.19 रुपये आणि डिझेल 94.92 रुपये प्रति लीटर
>> मुंबईत पेट्रोल 112.11 रुपये आणि डिझेल 102.89 रुपये प्रति लीटर
>> चेन्नईमध्ये पेट्रोल 103.31 रुपये आणि डिझेल 99.26 रुपये प्रति लीटर
>> कोलकातामध्ये पेट्रोल 106.77 रुपये आणि डिझेल 98.03 रुपये प्रति लीटर
पाहा तुमच्या भागातील इंधनाचे दर…
देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOC रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. तसेच मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.