Take a fresh look at your lifestyle.

जगातील सर्वात छोटे वर्किंग रिव्हॉल्व्हर पाहिले का ?

दिसायला छोटे पण किंमतीने मोठे !

जगातील सर्वात छोटे रिव्हॉल्व्हर तुम्ही पाहिले का? नसेल तर या आज त्याबाबत जाणून घेऊयात. अगदी खेळण्यातले वाटावे इतके छोटे पण खरे पिस्तुल ‘स्वीस मिनी गन’ या नावाने प्रसिद्ध आहे. या रिव्हॉल्व्हरची नोंद जगातील सर्वात छोटे वर्किंग रिव्हॉल्व्हर म्हणून ‘गिनीज बुक’मध्ये झाली आहे.

दिसायला अगदी छोटे असणाऱ्या या रिव्हॉल्व्हरची किंमत ५ लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. त्याची लांबी फक्त ५.५ सेंटीमीटर असून उंची ३.५ सेंटीमीटर व रुंदी १ सेंटीमीटर एवढी आहे. त्याचे वजन १९.८ ग्रॅम असून ते हातात सहज लपविता येईल असे आहे.

अमेरिका आणि ब्रिटनमध्ये या रिव्हॉल्व्हरच्या आयातीवर बंदी आहे. याची साईज छोटा असली तरी त्याचे सर्व फिचर्स मोठ्या रिव्हॉल्व्हर प्रमाणेच आहेत. या रिव्हॉल्व्हरचे गोल्डन व्हर्जन देखील आहे. मात्र ते ऑर्डरनुसार बनविले जाते. उत्पादकांनी दिलेल्या माहितीनुसार या रिव्हॉल्व्हरने कुणाचाही सहज जीव घेणे अवघड आहे. कारण त्याची पॉवर १ जूल पेक्षा कमी आहे. मात्र या रिव्हॉल्व्हरने संबंधित व्यक्ती जखमी होऊ शकेल एवढे नक्की.