Take a fresh look at your lifestyle.

मन म्हणजे गळकं भांडं !

आत काय साठलय ते जगाला कळतच.

मन असं इंद्रिय आहे की त्याला कोणतीही उपमा कमीच पडेल.त्याच्या विचारशक्तीपुढे सारं शुन्य आहे.ते विचारांशिवाय कधीच खाली नसतं.आपण आपल्या भावना कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी मन हे व्यक्त होतच.त्यासाठी त्याला शरीराकडुन तोंडाचा वापर न करता अनेक पध्दतीने व्यक्त करण्याची कला प्राप्त असते.त्यासाठी नाक आणि डोळे हे त्याचं मुख्य साधन आहे.नाही पटलं तर नाक मुरडुन मन भावना व्यक्त करतं.
राग आला आनंद झाला तर न बोलताही डोळ्यांद्वारे मन भावना व्यक्त करतं.अगदीच अनावर झालं तर हात पायांना हाणामारी करायला लावुन मन भावना व्यक्त करतं. थोडक्यात काय तर मन हे इंद्रियांवर स्वार झाले की मग बऱ्याचशा नको त्या गोष्टी घडुन जातात.पण हे सगळं करण्यामागं मनाची शांती हाच मुळ हेतु आहे पण तो साध्य होतो का? हा खरा प्रश्न आहे.
माऊली म्हणतात, देखें अग्नीमाजी घापती।तियें बीजें जरी विरुढती।तरी अशांता सुखप्राप्ती।घडो शके।।म्हणोनी अयुक्तपण मनाचें।तेंचि सर्वस्व दुःखाचे।या कारणे इंद्रियांचे।दमन निकें।।ज्ञा.२/३४७
विस्तवात घातलेले बीज जर उगवेल तर शांतीहीन पुरुषालाही सुखप्राप्ती होईल.पण असं होईल का?तर ते अशक्य आहे.
बिज उगवण्याऐवजी त्याची विस्तवामुळे राखच होईल.म्हणून इंद्रियांचा निग्रह करावा कारण मनाची चंचलता हेच दुःखाचं सार आहे. दुसऱ्याचं चांगलं व्हावं असा भाव जरी निर्माण झाला नाही तरी चांगलं झालेलं पहाण्याची वृत्ती अंगी बाणली पाहिजे.
मुळात आपण काय कुणाचं भलं करु शकतो?आपण एखाद्याला म्हटलं की तुझं वाटोळं होईल किंवा चांगलं होईल तर तसं घडेल का?हे विस्तवावर पेरलेल्या बीजासारखच नाही का?मग का अकारण आपण आपल्या मनाला ती सवय लावतोय?मन हे गळकं भांडं आहे. त्यात तयार होणारा विचारांचा द्रव साठुन रहात नाही. कुठतरी ते पचकतच.गळती होतेच.व्यक्त होण्याची घाई होतेच.
आपकी अपनी ऑनलाइन दुकान खोलना अब हो गया है बहुत ही आसान और सस्ता भी। 

सिर्फ़ ४९९ रुपए में आप अपने ख़्वाबोंको हक़ीक़त में बदल सकते हैं। 

आज ही www.apptmart.com पे रेजिस्टर कीजिये और एक क़दम सफलता की ओर उठायिये।

अधिक जानकारी के लिए आज ही सम्पर्क करें +91 70286 32421
आपलं मन दुःखाचा द्रव बाहेर पडु न देणारं भांडं असलं पाहिजे.सुखाचा द्रव त्यातुन सतत ओसंडून वाहिला पाहिजे.आपण दुसऱ्याला जे देणार तेच आपल्याला परत मिळतं.मग भंगार विचारांचं निर्माण करुन आनंद का गमवावा?
रामकृष्णहरी