Take a fresh look at your lifestyle.

📌आजचे 12 राशींचे राशिभविष्य

🔸20 ऑक्टोबर 2021

0
▪️मेष : आज आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. संपूर्ण खात्री करूनच संमती द्या. नसती काळजी करत बसू नका. विरोधक मन बेचैन करतील.
▪️वृषभ : आनंदाची अनुभूती घ्याल. पित्त प्रकृतीत वाढ संभवते. विनाकारण अडचणी सामोर्‍या येऊ शकतात. विद्यार्थ्यांना नवीन संधी मिळेल.
▪️मिथुन : आज दिनक्रम व्यस्त राहील. वाहन चालवताना काळजी घ्या. व्यवहार व नाते यात गफलत करू नका.
▪️कर्क : व्यावसायिक योजना गतिमान होतील. आजचा दिवस अनुकूल राहील. वरिष्ठांना नाराज करू नका.
▪️सिंह : नवीन कामात जपून पाऊले टाका. कुटुंबासोबत काळ व्यतीत कराल. अपचनाचा त्रास संभवतो. प्रतिस्पर्ध्यावर मात कराल.
▪️कन्या : प्रखर मत नोंदवताना काळजी घ्या. गैरसमज होऊ देऊ नका. हातातील काम पूर्ण झाल्याने समाधान मिळेल. संयम व धैर्य राखावे.
▪️तूळ : लोकांना योग्य तोच सल्ला द्यावा. कामाची दगदग राहील. थोडा स्वत:साठी वेळ काढावा. बोलण्यातून मान कमवाल.
▪️वृश्चिक : गुंतवणुकीकडे लक्ष द्यावे. वडीलधार्‍यांचे सल्ले ऐकावेत. गरजेच्या वस्तु खरेदी कराल. वाणी संयमित ठेवा.
▪️धनु : गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. घरासाठी काही खरेदी कराल. कार्यालयीन व्यक्तींशी मतभेद टाळावेत.
▪️मकर : आजचा दिवस अनुकूल असेल. थोडीफार धावपळ संभवते. जागेच्या व्यवहारात गाफिल राहू नका. आरोग्याकडे लक्ष द्या.
▪️कुंभ : कौटुंबिक शांतता जपावी. क्षुल्लक वादाला तोंड फुटू देऊ नका. व्यापारी वर्गाला दिलासादायक दिवस.
▪️मीन : कामाची व्याप्ती वाढेल. मुलांचे प्रश्न मार्गी लावाल. प्रवास सत्कारणी लावाल. आजचा दिवस अनुकूल असेल.
Leave A Reply

Your email address will not be published.