Take a fresh look at your lifestyle.

शॉर्टसर्किटने ऊस जळाला, नुकसान भरपाईची मागणी !

 

 

शिरूर: शिरूर तालुक्यातील गुनाट येथे विद्युत तारेचा शॉर्टसर्किट होऊन सुमारे सात एकरातील 500 टन ऊस जळून गेला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आम्हाला तातडीने नुकसानभरपाई मिळावी’, अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.
कोरोनाचे संकट त्यातच मोठ्या प्रमाणात झालेला पाऊस यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असताना अचानक आलेल्या संकटामुळे हे शेतकरी हादरून गेले आहेत.
शिवाजी भगत, मारुती भगत, दत्तात्रय भगत, मच्छिंद्र भगत, किसन भगत, नानासाहेब भगत, आनंदा भगत या सर्व शेतकऱ्यांच्या सुमारे सात एकरावरील उसाचे पूर्ण नुकसान झाले आहे. या सर्व शेतकऱ्यांची शेती गुनाट – निर्वी शिवेलगत आहे. या सात शेतकऱ्यांचे सुमारे सात एकरावरील पूर्ण ऊस जळून गेला असून त्यामध्ये त्यांचे 12 लाख 50 हजारांचे नुकसान झाले आहे.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने पंचनामा करून शासनाने आम्हाला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.