Take a fresh look at your lifestyle.

बिबट्याचे दर्शन अन् ग्रामस्थांची घाबरगुंडी !

 

अहमदनगर :तालुक्यातील गुंडेगाव शिवारात वारंवार घडणाऱ्या बिबट्याच्या दर्शनामुळे शेतकऱ्यांसह ग्रामस्थांच्या मनात दहशत निर्माण झाली असून शेतकऱ्यांनी शेतातील कामांना ब्रेक दिला आहे, शिवाय शेतमजुरांनी देखील कामावर येण्यास नकार दिला असल्याने यावरून यावरून परिसरात बिबट्याची किती दहशत निर्माण झाली आहे हे प्राप्त परिस्थितीवरून दिसून येत आहे. तसेच वन विभागाने याबाबत गंभीर होऊन उपाययोजना कराव्यात अशी मागणीही होत आहे.
प्राप्त माहितीनुसार गुंडेगाव पासून जवळच असणाऱ्या धावडेवाडी शिवारात सोमवारी सायंकाळी सहा वाजता बिबट्याचे दर्शन झाले धावडेवाडी शिवारात रस्त्याच्या कडेला असलेल्या बिबट्या येथील तरुण सुहास धावडे यांनी मोबाईल कॅमेरात टिपला आहे.
धावडेवाडी डोंगराजवळ सोमवारी सायंकाळी व्यायामासाठी सुहास धावडे गेला होता, त्यावेळेस डोंगराच्या वस्तीजवळ बिबट्या आढळला असल्याने त्यांनी तात्काळ नातेवाईक व ग्रामस्थांना याची व माहिती दिली यावेळी बिबट्या जवळपास पाच मिनिटे नजरेस पडत होता, संबंधित बाब नागरिकांनी वनविभागास कळविली असून यावर पुढील उपाय योजना वनविभाग काय करते याकडेच सर्व नागरिक लक्ष देऊन आहेत. तसेच गुंडेगाव वनक्षेत्र ८५० आहेत.तसेच हेक्टर असून शेजारी श्रीगोंदा वनक्षेत्र ही मोठ्या प्रमाणात पसरलेले असून शेतशिवार समृद्ध असल्याने लपण्यासाठी झाडेझुडपे, गवताळ भाग आहे तसेच डोंगराच्या पायथ्याशी माथ्यावर शेत जमीन असल्याने म्हशी, गाई, शेळ्या, शेतातच असल्याने त्यांच्यावर 9 बिबट्या हल्ला तर करणार नाही ना या अशी धास्ती शेतकऱ्यांनी घेतली आहे.