Take a fresh look at your lifestyle.

पंकजा मुंडेंवर आली ‘ही’ नवी जबाबदारी !

दिल्ली : राष्ट्रीय सचिव झाल्यानंतर भाजपने पंकजा मुंडे यांच्या खांद्यावर मोठी जबाबदरी दिली आहे. भाजपच्या पक्ष श्रेष्ठींनी मुंडे यांना मध्यप्रदेशचे प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे. यासंदर्भांत पंकजा यांनी स्वतः दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. मध्यप्रदेशमध्ये येत्या काळात होणाऱ्या निवडणुकांसाठी भाजपा सज्ज आहे. मला पक्षाकडून देण्यात आलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी मी परवा मध्यप्रदेशात जाणार आहे.

तसेच पुढे पंकजा म्हणाल्या, निवडणुका लढण्यात भाजपचा हातखंडा आहे. मी मध्यप्रदेशची प्रभारी आहे. मी परवा मध्यप्रदेशात जाणार आहे. खंडवात निवडणूक सुरू आहे. तीन विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक सुरू आहे. मी त्याचा प्रचार करणार आहे. प्रत्येक नेत्याला आपले विभाग दिले आहेत. निवडणुकीची जोरात तयारी सुरू आहे, असे पंकजा मुंडेंनी यावेळी सांगितले.

पुढे प्रत्येकजण काम करत आहे. आमचा संकल्प हा अंत्योदयाचा आहे. राजकीय पावलं उचलतो तसं सामाजिक पावलंही उचलणार आहोत. त्यावरही कालच्या बैठकीत चर्चा झाली. तसेच पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी राज्य सरकारला खडेबोल सुनावले.