Take a fresh look at your lifestyle.

ऐका हो ऐका ! गणेश चतुर्थीला येणार जगातील सर्वात स्वस्त स्मार्ट फोन !

गुगल आणि जिओची संयुक्तरित्या निर्मिती.

 

जामनगर : स्मार्ट फोन वापरकर्त्यांना मोठी खुशखबर आहे. गणेश चतुर्थीला जगातील सर्वात स्वस्त स्मार्ट फोन आणणार आहे, अशी घोषणा मुकेश अंबानी यांनी नुकती केली आहे. गुगल आणि जिओची यांनी संयुक्तरित्या त्याची निर्मिती करण्यात आली आहे.

▪️रिलायन्सच्या वार्षिक बैठकीत अंबानींची घोषणा.

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 44 व्या वार्षिक बैठकीत मुकेश अंबानी यांनी याबाबतची घोषणा केली आहे. ते म्हणाले की गूगल आणि जिओने संयुक्तपणे जिओ फोन नेक्स्ट तयार केला आहे. हा एक संपूर्ण फिचर स्मार्ट फोन आहे. हा स्मार्टफोन भारत आणि जगभरातील सर्वात परवडणारा स्मार्टफोन असणार आहे.

▪️गुगल प्ले वरून अॅप्स डाऊनलोड करता येणार.

दि.१० सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीपासून हा फोन बाजारात उपलब्ध होईल. भारतीय बाजारपेठेसाठी खास तयार केलेल्या जियोफोन नेक्स्ट स्मार्टफोनवर वापरकर्ते गुगल प्ले वरून अॅप्स डाउनलोड करू शकतात. स्मार्टफोनला सर्वोत्कृष्ट कॅमेरा आणि अँड्रॉइड अपडेटसुद्धा मिळतील. मुकेश अंबानी यांनी संपूर्णपणे फिचर स्मार्टफोनचे वर्णन केवळ भारतातच नव्हे तर जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन म्हणून केले आहे. कोरोना महामारी असूनही कंपनीचा लाभांश वाढला आहे, असे अंबानी म्हणाले. तर निता अंबानी म्हणाल्या, कोरोना साथीच्या वेळी लोकांना मदत करण्यासाठी रिलायन्स फाऊंडेशनकडून बरीच कामे केली आहेत.

▪️सर्वात मोठा मोबाइल डेटा कॅरियर बनला.

रिलायन्स जिओ जगातील सर्वात मोठा मोबाइल डेटा कॅरियर बनल्याचे कंपनीने सांगितले आहे. केवळ मागील वर्षात डेटा खपातील ही ४५% वाढ आहे. शिवाय, वापरकर्त्यांनी दरमहा ६३० कोटी जीबी वापरल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

▪️कंपनी देते ४२५ दशलक्षांहून अधिक ग्राहकांना सेवा.

मुकेश अंबानी यांनी खुलासा केला की, रिलायन्स जिओने या वर्षात ३७.८ दशलक्ष नवीन ग्राहकांना जोडले आहे. कंपनी आता ४२५ दशलक्षाहूनही अधिक ग्राहकांना सेवा देत आहे. जिओ प्लॅटफॉर्मचा निव्वळ नफा ८६,४९३ कोटी रुपये आहे.