Take a fresh look at your lifestyle.

आमदार निलेश लंकेंमुळे राजकारण्यांची प्रतिमा उजळली !

खासदार सुनील तटकरे यांची भावना.

पारनेर :आमदार निलेश लंके यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना महामारीच्या भयानक संकटकाळात हजारो रुग्णांना जीवनदान दिले आहे.त्यामुळेच समाजात आमदार लंके यांच्याकडून समाजकारणाला राजकारणाची जोड देवून राजकारण्यांची प्रतिमा उजळण्याचे काम केले असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा खासदार सुनील तटकरे यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांना रायगड “युवक आयकॉन” पुरस्कार प्रदान करताना खासदार सुनील तटकरे बोलत होते. रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे आमदार सुनिल शेळके,आमदार अनिकेत तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आ. लंके यांना सन्मानित करण्यात आले.
रायगड जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने रोहा येथे जिल्हा युवक मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास खा. सुनिल तटकरे पारनेरचे आ. निलेश लंके मावळचे आ.सुनिल अण्णा शेळके आ. अनिकेत तटकरे यांच्यासमवेत उपस्थित राहून युवकांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर पाटील, प्रदेश सरचिटणीस विजय मोरे, रोहा तालुकाध्यक्ष विनोदभाऊ पासलकर, नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, जिल्हा निरीक्षक अजय बिरवटकर, युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे, रोहा युवक तालुकाध्यक्ष जयवंत मुंडे, पं. स. उपसभापती, सदस्य, नगरसेवक, विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी खासदार सुनील तटकरे म्हणाले की,पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर आमदार निलेश लंके यांना “युवक आयकॉन” पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.केवळ भाषणबाजी न करता आपल्या कामाची छाप पाडली आहे. निस्वार्थी भावनेने काम करणारा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
कोरोना काळामुळे आ.निलेश लंके यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा केली. त्यांनी राजकारणाची ओळख खऱ्या अर्थाने बदलवली. म्हणून आमदार महोदयांना ‘युवक आयकॉन’ म्हणून संबोधले जाते. रोहा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस,खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार सुनिल शेळके, आमदार अनिकेत तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार निलेश लंके यांना सन्मानित करण्यात आले
युवक ही आपल्या पक्षाची ताकद आहे. युवक संघटनेने सर्वसामान्य लोकांची कामं करावी तसेच, सरकारच्या विविध योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचे काम करावे. जिल्ह्यात होणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युवकांनी आपली ताकद दाखवून द्यावी. पक्षात्मक संघटन वाढीसाठी स्वतःला झोकून देत प्रामाणिकपणे पक्षासाठी काम करावे. जिल्ह्याच्या विकासामध्ये युवकांचा वाटा मोलाचा असावा, असा आशावाद व्यक्त केला.