Take a fresh look at your lifestyle.

ईडी आणि पाऊस राष्ट्रवादीसाठी ‘लकी’ !

सुप्रिया सुळेंनी सांगितले याचे कारण...

चंद्रपूर : सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत खूप वेगवेगळ्या गोष्टी संपूर्ण महाराष्ट्राने पहिल्यात. या निवडणुकीत केंद्रस्थानी होते ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार. २०१९ ला शरद पवार स्वतः निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. यावेळी पवारांना ईडीकडून नोटीस आली होती. त्यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. तसेच पुढे या सर्व निवडणुकीचा टर्निग पॉईंट ठरला ती साताऱ्यातील पवारांची पावसातील प्रचारसभा.
यावेळी सातारा येथे श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारार्थ शरद पवार स्टेजवर भाषण करायला गेले असता तिथे जोरदार पाऊस आला होता. पाऊस सुरू असतानाही शरद पवारांनी भर पावसात भाषण केले होते. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात हा चर्चेचा विषय बनला. यावरून आता राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी ईडी आणि पाऊस राष्ट्रवादीसाठी फायद्याचे असल्याचे म्हटले आहे. त्या चंद्रपूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
आमचे सरकार दडपशाहीचे नाही. लोकशाहीत आपले म्हणणे मांडण्याचा सर्वांना अधिकार आहे. पवार कुटुंबीयांवर पन्नास वर्षांपासून आरोप होत आहे. आमच्या विरोधात ट्रकभर पुरावे होते. ते कधीच समोर आले नाही. लहान असताना या आरोपांचा त्रास व्हायचा.
काही लोकांना प्रसिद्धीसाठी आरोप करण्याची सवय झाली आहे. आपल्यावरील आरोपांमुळे एखादी व्यक्ती मोठी होत असेल तर आनंदच आहे. तसेही ईडी आणि पाऊस राष्ट्रवादीसाठी ‘लकी’ आहे, या शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोधकांना टोला लगावला.