Take a fresh look at your lifestyle.

शरीर हेच सुखदुःख भोगण्याचे माध्यम आहे !

त्याचे लाड करणे पडते महागात.

जोपर्यंत शरीर तरुण आहे तोपर्यंत ते कोणत्याही यातना सहज सहन करते.पण ज्याला सुरुवात आहे त्याला शेवट आहेच.शरीर मायामय जगतातील सर्व सुखं उपभोगण्याचं माध्यम आहे.नुसता जीवात्मा ते भोगु शकत नाही.इच्छित कर्म करण्याची शक्ती शरीरात आहे. पण खरंच शरीर श्रेष्ठ आहे का?कर्मगतीसाठी ते श्रेष्ठ आहे पण दुष्कर्मगतीने जाणारांसाठी ते अत्यंत घातक आहे.त्याचा योग्य वापर करता आला तरच मानव जीवनाचे सार्थक आहे.

तुकोबाराय म्हणतात,
शरीर दुःखाचे कोठार।शरीर रोगाचे भांडार।शरीर दुगपधीची धार।नाही अपवित्र शरीर ऐसे।।१
शरीर उत्तम चांगलें।शरीर सुखाचें घोसुलें।शरिरे साध्य होय केलें।शरीरें साधलें परब्रह्म।।ध्रु
शरीर विटाळाचे आळें।मायामोहपाशजाळें।पतन शरीराच्या मुळें।शरीर काळें व्यापिलें।।२
शरीर सकळ हे शुद्ध।शरीर निधींचा ही निध।शरीरे तुटे भवबंध।वसे मध्ये भोगी देव शरीरा।।३
शरीर अविद्येचा बांधा।शरीर अवगुणांचा रांधा।शरीरीं वसे बहुत बाधा।नाहीं गुण सुदा एक शरीरीं।।४शरीरी दुःख नेदावा भोग।न द्यावें सुख न करी त्याग।नव्हे वोखटे ना चांग।तुका म्हणे वेग करीं हरीभजनीं।।५
शरीर काळा अधीन आहे. पतनाच्या गोष्टी,अनेक बाधा आणि त्यायोगे येणारी दुःख,मायापाशात फसण्याचं आणि पश्चाताप भोगण्याचं मोठं साधन शरीर आहे.पण ते योग्य मार्गाने वापरता आले तर शरीर भवबंधनातुन मुक्त होण्याचं साधन आहे. शरीरात देवानं वास्तव्य करावं इतकं ते पवित्र करता येते.त्यासाठी त्याचे फार लाडही करु नयेत आणि कष्टही देऊ नयेत.नुसत्या हरीभजनाने ते योग्य मार्गाने चालते.
आपण सतत याचे स्मरण ठेवले पाहिजे की शरीरात विकार निर्माण करणाऱ्या गोष्टींचा मोह दुर ठेवता आला पाहिजे.तुकोबाराय म्हणतात,मुळातच शरीर मलमुत्राचे भांडार आहे. अजून त्यात भर टाकण्याचे काम आपण स्वतःका म्हणून करावे?
तंबाखू,विडी,दारु त्याचा लवकर विनाश करते हे न कळण्याइतके आपण मुर्ख आहोत का?
रामकृष्णहरी