Take a fresh look at your lifestyle.

📌 आजचे 12 राशींचे राशिभविष्य

🔸 18 ऑक्टोबर 2021

 

▪️मेष : आज जुनी येणी प्राप्त होतील. गृहोपयोगी वस्तु खरेदी कराल. नोकरीत मान मिळेल. नियोजित कामात प्रयत्नशील राहावे.
▪️वृषभ : कामात धांदल टाळावी. एखाद्यावर अतिविश्वास टाळावा. कलेत प्राविण्य दाखवाल. व्यवसायात खबरदारी घ्यावी.
▪️मिथुन : लहान प्रवास घडतील. करियर बदलला काळ अनुकूल. कामासंदर्भात तज्ञ व ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घ्यावा. जोडीदारांकडून फायदा होईल.

▪️कर्क : भागीदारीतील निर्णय धीराने घ्या. तडकाफडकी कोणतेही काम करू नका. नवीन प्रकल्प लक्ष वेधून घेईल.
▪️सिंह : तुमच्या कालगुणांना वाव मिळेल. ओळखीच्या लोकात लोकप्रिय व्हाल. तुमचा जनसंपर्क वाढेल. अतिउत्साहात निर्णय घेऊ नका.
▪️कन्या : घरात धार्मिक कार्य घडेल. मुलांच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे. मानसिक ताण वाढू देऊ नका. जोडीदारापासून गोष्टी लपवू नका.

▪️तूळ : घरासाठी पैसा खर्च कराल. मित्रांचा प्रभाव राहील. त्यांच्यासाठी पैसा खर्च करावा लागेल. कौटुंबिक वादाचे प्रसंग टाळावेत.
▪️वृश्चिक : जुनी येणी वसूल होतील. मानसिक शांतता जपावी. मनातील इच्छा प्रबळ राहील. काही मूलभूत गोष्टीत परिवर्तन करावे लागेल.
▪️धनु : सामाजिक मान वाढेल. घरातील प्रश्न संयमाने सोडवा. भावंडांशी चर्चा करावी. कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींकडे लक्ष वेधले जाईल.

▪️मकर : शारीरिक अस्वस्थता कमी होईल. मुलांच्या इच्छा जाणून घ्याव्यात. खरेदीचे योग आहेत. कौटुंबिक कामात बराच वेळ घालवाल.
▪️कुंभ : मनोरंजनात वेळ घालवा. कठोर प्रवृत्तीच्या लोकांपासून दूर रहा. आपले कर्तृत्व दाखवून द्या.
▪️मीन : आज मन काहीसे विचलीत राहील. क्रोधाच्या आहारी जाऊ नका. चटकन कोणत्याही निर्णयावर येऊ नका.