Take a fresh look at your lifestyle.

पारनेर बाजार समितीत आता ‘एटीएम’ ची सुविधा !

पारनेर : तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा या शेतमालाची खरेदी -विक्रीचे व्यवहारी करणारी राज्यात व परराज्यात नावाजलेली बाजार पेठ आहे.बाजार समितीच्या पारदर्शी कारभारामुळे पारनेर तालुक्यासह ,पुणे,नगर,श्रीगोंदा, शिरुर,जुन्नर तालुक्यातील शेतकरीही शेतमाल विक्रीसाठी येत असतात.त्या सर्व शेतकऱ्यांचे सुविधेसाठी अहमदनगर जिल्हयासह बँकेचे मोबाईल ए.टी.एम व्हॅन बाजाराच्या दिवशी समितीमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे.सदर मोबाईल ए.टी.एम व्हॅनचे उद्घाटन जिल्हा बँकेचे अध्यक्ष उदय शेळके यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी उदय शेळके यांनी बाजार समितीने मागील पाच वर्षात विविध विकास कामे राबविलेली आहेत ते पाहुन समाधान व्यक्त केले.त्यामुळे शेतकऱ्यांचा बाजार समितीवर असणारा विश्वास पाहुनच शेतकऱ्यांसाठी जिल्हा बँकेमार्फत ए.टी.एम ची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे.
बाजार समितीमध्ये आठवडयातील तीन दिवस रविवार,बुधवार व शुक्रवार कांदा या शेतमालाचे खरेदी विक्री व्यवहार होत असतात.त्या दिवशी ही सुविधा उपलब्ध असणार आहे.त्याचा लाभ शेतकऱ्यांना होणार असल्याचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी सांगितले.
▪️शेतकऱ्यांसाठी शुद्ध पाणी : सभापती गायकवाड
बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी बाजाराच्या दिवशी अनेक शेतकरी येत असतात. त्यांना व बाजार आवारातील सर्व घटकांसाठी शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे असा संचालक मंडळाचा अनेक दिवसांचा मानस होता. त्यासाठी कंपनी धर्तीवर आधारित आर.ओ प्लांटची उभारणी बाजार समितीमध्ये करण्यात आलेली आहे तीही मान्यवरांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आली .त्यामुळे यापुढे सर्व शेतकरी व्यापारी हमाल मापाडी वाहन चालक मालक या बाजार समितीशी निगडित सर्व घटकांना शुद्ध पिण्याची पाण्याची सोय कायमस्वरूपी होणार आहे. वरील दोन्ही शेतकरी हिताच्या सुविधा सुरु केल्यामुळे उपस्थित व्यापारी व शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी बाजार समिती संचालक अण्णासाहेब बढे ,महानगर बँकेचे संचालक कोठावळे,व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मारुती रेपाळे सर्व व्यापारी हमाल मापाडी बांधव अनेक शेतकरी तसेच जिल्हा बँकेचे अधिकारी संजय बरडे, तालुका विकास अधिकारी इंद्रभान शेळके, कार्यालयीन अधिक्षक प्रभाकर लाळगे, वसुली अधिकारी बबन शेलार, संजय दरंदले, शाखाधिकारी भगवान शिंदे, अमोल रेपाळे सचिव संघटनेचे अध्यक्ष दत्ता पतके उपस्थित होते या दोन्ही सुविधांचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन उपसभापती विलास झावरे व संचालक मंडळाने केले आहे.