Take a fresh look at your lifestyle.

ट्रेनच्या मागे ‘X’ हे चिन्ह का असते?

 

जर तुम्ही ट्रेनने प्रवास केला असेल तर तुम्ही पहिले असेल ट्रेनच्या आत आणि बाहेर वेगवेगळ्या प्रकारचे चिन्ह असतात. यातील एक महत्त्वाचे चिन्ह म्हणजे ट्रेनच्या शेवटच्या डब्यामागे असलेले X हे चिन्ह असते. मात्र या X चा काय अर्थ आहे? ते पाहूयात…

भारतात चालणाऱ्या पॅसेंजर ट्रेनच्या मागे पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगात X हे चिन्ह काढलेले असते. भारतीय रेल्वेचा नियम असल्याने हे चिन्ह सर्वच पॅसेंजर ट्रेनच्या मागे असणे गरजेचे आहे. तुम्ही एलव्ही असेही काही ट्रेनवर लिहिलेले पहिले असेल. सोबतच ट्रेनच्या मागे लाल रंगाचा लाइटही ब्लिंक करत असतात.
एलव्ही ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर लिहिण्याचा अर्थ हा ट्रेनचा शेवटचा डबा आहे. नेहमी X या चिन्हाने हा एलव्ही लिहिला जातो. प्रत्येक ट्रेनच्या मागे X हे चिन्ह हे कर्मचाऱ्यांसाठी संकेत असतो की, हा शेवटचा डबा आहे. जर एखाद्या ट्रेनच्या मागे असे लिहिलेले नसेल तर याचा अर्थ हा होतो की, ट्रेन आपत्कालीन स्थितीत आहे.

ट्रेनच्या मागे जळत असलेला लाल लाईट हा ट्रॅकवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी निर्देश असतो की, ट्रेन त्या ठिकाणाहून पास झाली आहे, जिथे ते काम करत होते. हा लाईट खराब वातावरणात कर्मचाऱ्यांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित करतो. तसेच या लाईटने मागून येणाऱ्या ट्रेनला सुद्धा इशारा देखील मिळतो.