Take a fresh look at your lifestyle.

‘या’ कलाकारांना लोक देव म्हणून पूजायला लागले होते! 

 

आज आपण अशा काही कलाकारांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांना खऱ्या आयुष्यात लोकांनी देवाचा दर्जा देऊन उपासना करण्यास सुरुवात केली होती. त्यावर एक नजर…
अरुण गोविल : रामानंद सागर यांच्या लोकप्रिय ‘रामायण’ या मालिकेत रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल यांना या भूमिकेने मोठी प्रसिद्धी मिळवून दिली. त्यांचे चरित्र लोकांच्या मनात इतके स्थिर झाले की, लोक त्यांची देव समजून पूजा करायला लागले होते.
दीपिका चिखलिया : ‘रामायणा’त दीपिका यांनी सीतेची भूमिका अतिशय सुंदरपणे साकारली. त्यांनी या व्यक्तिरेखेला त्यांनी एक वेगळ्या उंचीवर नेवून ठेवले. त्यामुळेच असे म्हटले जाते की, आजही देशातील अनेक मंदिरांमध्ये अरुण गोविल आणि दीपिका यांचे चित्र राम-सीतेच्या रूपात पहायला मिळते.
दारा सिंग : अभिनेते दारा सिंग यांनी ‘बजरंगबली’ चित्रपटात आणि नंतर रामायणात हनुमानाची भूमिका साकारली. हे दोन्ही पात्र त्यांनी अशा प्रकारे बजावले की, आजही जेव्हा हनुमानांबद्दल एखादा चित्रपट किंवा मालिका येते तेव्हा दारासिंह लोकांच्या मनात सर्वात अगोदर येतात.
स्वप्निल जोशी : रामानंद सागर दिग्दर्शित ‘श्री कृष्णा’ या मालिकेत स्वप्निलने तारुण्यातील कृष्णाची अजरामर भूमिका साकारली होती. यामुळे तो लोकांमध्ये कृष्णा म्हणून खूप प्रसिद्ध झाला होता.
नितीश भारद्वाज : ‘महाभारत’ या मालिकेत नितीश यांनी श्रीकृष्णाची महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. त्या भूमिकेचे गरुड आजही लोकांच्या मनावर कायम असल्याने लोक आजही हे पात्र विसरलेले नाहीत. त्यांची बोलण्याची शैली, चेहर्‍यावरील भाव पाहून लोक मंत्रमुग्ध झाले होते.