Take a fresh look at your lifestyle.

‘आई शप्पथ… साडीवरती परीच दिसतेय !’

आर्चीच्या पारंपारिक लूकवर चाहते झाले फिदा.

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. यातच ‘ सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने देखील तिचे काही पारंपरिक वेशातील फोटो शेअर करून दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोला चाहत्यांकडून भरपूर लाईक,कमेंटस् मिळाल्या.
रिंकूने पिवळ्या रंगाची एक सुंदर साडी नेसली असून, त्यावर तिने लाल रंगाचा ब्लाऊज घातला आहे. हातात लाल रंगाच्या बांगड्या, सोनेरी रंगाची ज्वेलरी आणि कपाळी टिकली लावली आहे. या पारंपारिक लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, ‘विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा.’
तसेच या कॅप्शनमध्ये तिने हे देखील सांगितले आहे की, तिने तिच्या ‘आजी’ची साडी नेसली आहे. तिच्या चाहत्यांना तिचा हा लूक खूप आवडला. तिच्या एका चाहत्याने या फोटोवर कमेंट केली आहे की, ‘आई शप्पथ साडीवरती परीच दिसतेय.’ तसेच या फोटोवर हार्ट ईमोजी पोस्ट करत आहेत आणि तिला दसऱ्याच्या शुभेच्छा देत आहेत.
रिंकूने वयाच्या पंधराव्या वर्षी ‘सैराट’ या मराठी चित्रपटातून पदार्पण केले. त्यानंतर तिने ‘कागर’ आणि ‘मेकअप’ या चित्रपटात देखील उत्तमरित्या भूमिका साकारल्या आहे. सोशल मीडियाच्या माध्यमाने ती प्रेक्षक, चाहत्यांशी संवाद साधत असते. तसेच दसऱ्यानिमित्त आजीची साडी नेसली असून त्यावरील फोटोने तर आणखीणच लक्ष वेधत आहे.