Take a fresh look at your lifestyle.

📌 आजचे 12 राशींचे राशिभविष्य

🔸 7 सप्टेंबर 2021

 

 

▪️मेष : घरातील वातावरण आनंदी राहील. आततायीपणा करू नये. प्रयत्नांची कास सोडू नये.

▪️वृषभ : व्यावसायिक ठिकाणी काही लक्षात ठेवण्याजोगे अनुभव येतील. ग्रहांचा चांगला पाठिंबा मिळेल. मेहनतीला मागे हटु नका.

▪️मिथुन : कौटुंबिक चर्चेत आक्रमक होऊ नका. कौटुंबिक स्थिती संयमाने हाताळा. हित शत्रूंवर लक्ष ठेवा.

▪️कर्क : अंगीभूत कलागुणांना वाव मिळेल. नवीन ओळखी वाढतील. प्रेमाला उत्तम साथ मिळेल.

▪️सिंह : आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. कामातील समस्या सोडवता येतील. मनात अनामिक भीती दाटून येईल.

▪️कन्या : व्यवसाय पुन्हा मूळ पदावर येईल. आर्थिक गणिते सुधारतील. योजनेला मूर्त रूप द्याल.

▪️तूळ : कामात असताना इतरत्र लक्ष देऊ नका. एखादी घटना मन खिन्न करू शकते. विरोधक नरमाईने घेतील.

▪️वृश्चिक : किरकोळ दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका. पराक्रमात वाढ होईल. दिनक्रम व्यस्त राहील.

▪️धनु : कौटुंबिक गैरसमज टाळा. शिक्षण, स्पर्धेत यश मिळेल. बचतीच्या योजना आखाव्यात.

▪️मकर : व्यायामाचा आळस करू नका. जोडीदार तुमच्यावर खुश असेल. मित्रांची भेट मन प्रसन्न करेल.

▪️कुंभ : कोर्टाची कामे मार्गी लागतील. आर्थिक बाबतीतील प्रयत्न यश देतील. चुगलखोर व्यक्तींकडे दुर्लक्ष करावे.

▪️मीन : कामातील उत्साह व धडाडी वाढेल. जुने मित्र भेटतील. वाहन चालवताना काळजी घ्या. बोलण्यात सौम्यता बाळगा.