Take a fresh look at your lifestyle.

खासदार विखेंना खुमखुमी आलीय का ? राज्यमंत्री तनपुरेंनी दिला ‘असा’ इशारा !

0
अहमदनगर : खासदार डॉ. सुजय विखे सध्या निवांत झोप येणाऱ्या पक्षामध्ये गेलेत. त्यामुळे त्यांना दुसऱ्याच्या बॅलन्सशीटमध्ये डोकावण्याची खुमखुमी आली आहे. कोणाची बॅलन्सशीट तपासायची असेल तर ते काम आम्हालाही येते,’असा शब्दात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी थेटखा.विखे यांना इशाराच दिला आहे.
राज्यमंत्री तनपुरे यांनी आज अहमदनगरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी खा.विखे यांना टीकेचे ‘लक्ष्य’ केले.भाजपाच्या आंदोलनावर तनपुरे यांनी टीका केली.

दोन दिवसांपूर्वी खासदार डॉ. विखे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने नगरमध्ये उपोषण केले. यावेळी विखे यांनी सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांवर टीका केली होती. त्याला आज (शनिवारी) राज्यमंत्री तनपुरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. तसेच भारतीय जनता पक्षाने केलेल्या आंदोलनावरही टीका केली.
यावेळी पत्रकारांशी बोलताना राज्यमंत्री तनपुरे म्हणाले की,’पालकमंत्री मुश्रीफ हे वैद्यकीय कारणामुळे जिल्ह्यात येऊ शकले नाहीत. ते वयाने आणि अनुभवाने ज्येष्ठ व अभ्यासू नेते आहेत, याचे तरी भान टीका करणाऱ्यांनी ठेवायला हवे होते. आपली बॅलन्सशीट तपासली जाईल, या भीतीने आधीच काही लोक भाजपमध्ये गेले आहेत. हर्षवर्धन पाटील यांनी याची कबुली देताना आपल्याला भाजपमध्ये आल्यापासून निवांत झोप लागते, असे नुकतेच म्हटले आहे. विखेही अशा निवांत झोप येणाऱ्या पक्षात गेलेले आहेत. त्यामुळे दुसऱ्याच्या बॅलन्सशीटमध्ये डोकावण्याची खुमखुमी त्यांना येत असावी, असेही तनपुरे म्हणाले.
Leave A Reply

Your email address will not be published.