एका महिलेला तिच्या दुर्धर आजारामुळे नावलौकीक मिळालाय. जगातील सर्वात उंच महिला म्हणून तिची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालीय. या महिलेचा नाव रुमेसा गेलगी असून ती तुर्कस्तानातील रहिवासी आहे. तिची उंची तब्बल 7 फूट 0.7 इंच आहे.
रुमेसा एक दुर्मिळ आजाराचा सामना करत असून तिची उंची वेगाने वाढली आहे. मात्र आपल्या या आजारामुळे वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्यानं तिला खूप आनंद देखील झालाय. ती एक भीतीचा आजार रुमेसा जेनेटिक डिसऑर्डरचा सामना करते आहे.
याच आजारामुळे तिची उंची सातत्यानं वाढतच आहे. 2014 मध्ये रुमेसाचं नाव सर्वाधिक उंच युवती म्हणून नोंदलं गेलं होतं. त्यानंतर ती पहिल्यांदा चर्चेत आली होती. जास्त उंची असल्यानं रुमेसाला चालणं, फिरणं कठीण झालं होतं. त्यामुळे व्हिलचेअरवर बसून फिरत असते. सध्या रुमेसासोबत कायमस्वरूपी एक असिस्टंट असून ती तिला चालण्या-फिरण्यासाठी मदत करते.