मुंबई :कोरोना संसर्ग रोगाने सगळीकडे थैमान घातले होते. जवळजवळ त्याला आता दोन वर्ष होत आलेत. त्याकाळात सरकारने लॉकडाऊनही जाहीर केले होते. परंतू लॉकडाऊन उठवल्यानंतर बऱ्याच वस्तूंच्या किंमतीही वाढल्या असल्याचे पाहायला मिळत आहे.यामध्ये पेट्रोल-डिझेलचाही समावेश झाला होता. महत्वाची बाब म्हणजे अजूनही या किंमती वाढतच चालल्या आहेत.
मागील काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये सतत वाढ झालेली पाहायला मिळतं आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांसाठी पेट्रोल-डिझेलच्या किंमती हा चिंतेचा विषय बनला आहे. तर आजही पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे.
आज शनिवार 16 ऑक्टोबर रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनूसार, पेट्रोल आणि डिझेल प्रति लिटरच्या किंमतीमध्ये तब्बल 35 पैशांची वाढ झाली आहे.
मुंबईमध्ये पेट्रोलचा प्रतिलीटर दर 111.44 रूपये इतका आहे. तर डिझेल प्रती लिटर 102.13 रूपये आहे. तसेच पॉवर पॅट्रोलचा दर 115.38 रूपये असल्याची माहिती समोर येतं आहे. त्याचप्रमाणे दिल्लीमध्ये पेट्रोल प्रति लीटर 105.47 रूपये आहे आणि डिझेलचा दर 94.27 रुपये आहे.