Take a fresh look at your lifestyle.

सरकार पडेल तेंव्हा तुम्हाला कळणारही नाही !

देवेंद्र फडणवीसांच्या कोपरखळ्या.

 

मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार, याची उत्सुकताही सर्वांना लागून राहिली होता. अखेर उद्धव ठाकरे यांनी भाजपावर थेट निशाणा साधला.

शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा षण्मुखानंद सभागृहात शुक्रवारी पार पडला. प्रतिवर्षी शिवाजी पार्कवर होणार सोहळा यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या लोकांच्या उपस्थितीतच संपन्न झाला.
यावेळी` भाजपमध्ये 2019 पासून बाहेरच्या पक्षातून आलेल्यांची संख्या वाढली आहे. याच मुद्द्याला धरून ठाकरे यांनी लक्ष वेधले आहे. जगातील सर्वात मोठ्या पक्षाकडे उमेदवार नाहीत, उपरे आणावे लागतात, अशी जहरी टीका मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपावर केली होती. तसेच या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपला सरकार पाडण्याचे जाहीर आव्हान दिले. भाजपने महाविकास आघाडी सरकार पाडून दाखवावे असे म्हटले होते.
यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘उद्धव ठाकरे म्हणतात की, सरकार पाडून दाखवा. पण ज्या दिवशी हे सरकार पडेल तेव्हा तुम्हाला कळणारही नाही’. त्यामुळे भाजप विरुद्ध शिवसेना असा वाद पुन्हा एकदा पेटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
तसेच ‘तुम्ही सरकार चालवून तर दाखवा, शेतकऱ्यांना मदत करून तर दाखवा तसेच काम करून तर दाखवा’, असे म्हणत उद्धव ठाकरेंना कोपरखळ्या मारल्या आहेत.