Take a fresh look at your lifestyle.

दहावी, बारावी पास असणाऱ्यांना रेल्वेत नोकरीची संधी!

'या' तारखेपर्यंत करता येणार ऑनलाईन अर्ज ! 

रेल्वेत भरती होण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आहे. ती म्हणजे रेल्वे रिक्रूटमेंट सेलने (RRC) नॉर्थ-सेंट्रल रेल्वेमध्ये अप्रेंटिसशिपसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. 
रेल्वेकडून ट्रेड अप्रेंटिसच्या 1600 हून अधिक रिक्त जागांच्या भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
अर्ज करण्याची वयोमर्यादा 15 वर्षे ते 24 वर्षे आहे. 01 डिसेंबर 2021 पर्यंतचे वय ग्राह्य धरले जाईल. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमांनुसार वयोमर्यादेत सूट दिली जाणार आहे.
उमेदवाराने किमान 50% गुणांसह दहावी, बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासह, संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

अर्जासाठी 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. आरक्षित प्रवर्ग आणि महिला उमेदवारांना अर्ज शुल्कामध्ये सूट दिली जाईल. गुणवत्तेच्या आधारावर उमेदवारांची निवड होणार आहे. जी ट्रेडनिहाय 10 व्या गुणांच्या आधारे तयार केली जाईल. अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 डिसेंबर 2021 आहे. इच्छुक उमेदवार http://rrcpryj.org वर नॉर्थ-सेंट्रल रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.