Take a fresh look at your lifestyle.

सैनिक बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती करावी!

जिल्हा उपनिबंधकांकडे सभासदांची मागणी.

0

 

अहमदनगर : पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची मुदत ऑगस्ट महिन्यात संपली आहे.मात्र कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बँकेची पंचवार्षिक निवडणूक लांबली आहे.बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाच्या गैरकारभाराबाबत अनेक तक्रारी सहकार विभागाकडे करण्यात आल्या आहेत.त्यामुळे बँकेची निवडणूक होईपर्यंत प्रशासकाची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी सभासद बाळासाहेब नरसाळे ,मारुती पोटघन,कॅप्टन विट्ठल वराळ,विनायक गोस्वामी,विक्रमसिंह कळमकर, यांनी जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या संदर्भात जिल्हा उपनिबंधक आहेर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,संचालक मंडळाच्या गैरव्यवहाराच्या व अनियमिततेच्या अनेक तक्रारी सहकार विभागाकडे करण्यात आल्या आहेत.यातील काही प्रकरणाची चौकशी सुरू आहे.काही प्रकरणांमध्ये चौकशी अधिकाऱ्यांनी संचालक मंडळाच्या गैरकारभारावर ताशेरे ओढले आहेत.गैरव्यवहारांची चौकशी सुरू असताना मुदत संपलेले संचालक मंडळ सत्तेत राहणे उचित नाही.

मुदतवाढ मिळालेल्या संचालकांकडून आणखी गैरव्यवहार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.हा प्रकार सभासदांच्या आणि बँकेच्या आर्थिक हितासाठी घातक आहे.त्यामुळे संचालक मंडळ बरखास्त करून बँकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात यावी व बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक विहित वेळेत घ्यावी अशी ही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.