Take a fresh look at your lifestyle.

पारनेरच्या कलाकारांनी केला ‘हास्याचा धिंगाणा’ !

मनोरंजनाच्या स्क्रिपटचे झाले पूजन.

शिरूर : पारनेर ही कलाकारांची खाण आहे, पारनेरच्या मातीने अनेक कलाकारांना घडविले, अनेक कलाकारांना पैलू पाडण्याचे काम केले. त्यापैकीच म्हसे येथील रामदास राऊत हे एक हरहुन्नरी कलाकार. रामदास राऊत यांच्या सिद्धहस्त लेखणीतून ‘हास्याचा धिंगाणा’ ही तुफान कॉमेडी वेबसिरीज साकारत असून दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर या वेबसिरीजच्या स्क्रिप्टचे पूजन निघोज गणातील पंचायत समिती सदस्य दिनेश बाबर व मित्रपरिवार यांच्या हस्ते करण्यात आले.
‘हास्याचा धिंगाणा’ या वेबसीरिज मध्ये आजी आजोबा यांची पोट धरुन हसविणारी कॉमेडी आणि त्यानंतर त्यांच्या घरातील मुलीला पाहायला आलेले पाहुणे त्यानंतर त्यांच्या दोन लहान निरागस नातवांनी घर डोक्यावर घेत घरात घातलेला धिंगाणा.
मनोरंजनाची शंभर टक्के हमी असलेली ही वेबसिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर या मनोरंजनाची निखळ करमणूक करणाऱ्या स्क्रिप्टचे पूजन करण्यात आले. यावेळी या वेबसिरीजचे निर्माते, लेखक, दिग्दर्शक रामदास राऊत यांच्यासह निघोज गणातील पंचायत समिती सदस्य दिनेश बाबर, शुभम जगदाळे, अभिषेक वडघुले, दत्ता वाबळे, ज्येष्ठ पत्रकार सतीश डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते.
रामदास राऊत यांच्या लेखणीनीतून साकारलेली ‘हास्याचा धिंगाणा’ ही वेबसिरीज अत्यंत विनोदी असून ती निश्चित प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल आणि रसिक मायबाप या वेबसीरिजला डोक्यावर घेतील, असा विश्वास यावेळी पंचायत समितीचे सदस्य दिनेश बाबर यांनी व्यक्त केला.