Take a fresh look at your lifestyle.

पंकजा मुंडेंनी भगवानगडावर घेतली ‘अशी’ शपथ !

'तो' पर्यंत हार,फेटा स्विकार नाही.

 

बीड : मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत गळ्यामध्ये हार घालणार नाही आणि ओबीसीचं राजकीय आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी माझ्या डोक्याला फेटा बांधणार नाही अशी शपथ भाजपा नेत्या,माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी काल दसरा मेळाव्यानिमित्ताने भगवान गडावर घेतली.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वंचितांच्या दारापर्यंत जाऊन झुकून नमस्कार करुन त्यांच्या विकासासाठी झटण्याची शपथ या मेळाव्याच्या माधम्यातून शपथ मी खाते, असे पंकजा मुंडे यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे.
जनतेच्या हितासाठी मराठा आरक्षण असेल, ओबीसीचं राजकीय आरक्षण असेल यावर आपण आवाज उठवणार आहे. मराठा समाज आणि ओबीसी समाजात भांडण लावण्याचे कारस्थान सुरु आहे. मराठा समाज शिक्षणाचे आरक्षण मागतो, ओबीसी समाज राजकीय आरक्षण मागतो, दोघांची भांडणं नाहीत, दोघं मिळूनच बहुजन समाज आहे. आणि या बहुजन समाजाची वज्रमुठ करण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याचे मुंडे यांनी सांगितले.
मी जो दौरा करणार आहे, त्या दौऱ्यात मराठा समाज, ओबीसी आरक्षण, शेतकऱ्यांना मिळणार मदत, शेतमजूर, ऊसतोड कामगार आणि मजूर, महिलांची सुरक्षा हे घेऊन मी दौरा करणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.