Take a fresh look at your lifestyle.

📌 आजचे 12 राशींचे राशिभविष्य 

🔸 16 ऑक्टोबर 2021   

 

▪️मेष : वेळेचे योग्य नियोजन करावे. आध्यात्मिक गोष्टींकडे कल राहील. नवीन विचारांना चालना द्यावी. चमचमीत पदार्थ खाल.
▪️वृषभ : मैत्रीतील घनिष्टता वाढेल. व्यापार्‍यांना चांगला लाभ होईल. मनासारख्या घटना घडून येतील.
▪️मिथुन : नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. नवीन आव्हाने स्वीकाराल. बिनधास्त वागू नका. तरुण वर्गाशी संपर्क वाढेल.
▪️कर्क : सरकारी नोकरदारांना प्रगती करता येईल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. घरासाठी मोठ्या वस्तु खरेदी कराल.
▪️सिंह : हाताखालच्या लोकांना चलाखीपणे सांभाळा. हितशत्रूंकडे बारीक लक्ष ठेवावे. कामानिमित्त प्रवास करावा लागेल.
▪️कन्या : जोडीदाराला आपले मत स्पष्ट सांगा. मनातील संभ्रम दूर करावेत. इतरांना सहृदयतेने मदत कराल.
▪️तूळ : मनातील शंका-कुशंका काढून टाकाव्यात. पैज जिंकता येईल. अचानक धनलाभ संभवतो. देणी फेडता येतील.
▪️वृश्चिक : काही नवीन संधी उपलब्ध होतील. छुप्या शत्रूंचा बंदोबस्त करता येईल. कामाच्या ठिकाणी तुमचा दबदबा राहील.
▪️धनु : जोडीदाराची बाजू समजून घ्या. कामे मनाजोगी पार पडतील. घरगुती वातावरण खेळीमेळीचे असेल.
▪️मकर : तुमची महत्वाकांक्षा वाढीस लागेल. हटवादीपणा बाजूला सारावा. हातातील अधिकार वापरावेत.
▪️कुंभ : घरगुती गोष्टींत अधिक लक्ष घालाल. आपल्या अधिकारांची जाणीव ठेवावी. वेळेचे योग्य नियोजन करा.
▪️मीन : निसर्गाच्या सानिध्यात रमून जाल. मित्रमंडळींबरोबर फिरायला जाल. कौटुंबिक जबाबदारी पार पाडाल.