Take a fresh look at your lifestyle.

बॉलिवूडमध्ये सर्वाधिक श्रीमंत अभिनेत्याच्या यादीत कोण आघाडीवर?

 

 

बॉलिवूड स्टार्स प्रत्येक बाबतीत आघाडीवर आहेत. या स्टार्सची कमाई मुख्यतः त्यांच्या चित्रपट आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून होत असते. यावरून आपण अंदाज लावू शकतो की या स्टार्सची एकूण मालमत्ता किती असेल. पण आज आपण अशा आघाडीच्या पाच अभिनेत्यांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांना बॉलिवूडचे सर्वात श्रीमंत कलाकार म्हटले जाते…
● शाहरुख खान : GQ India मधील एका रिपोर्टनुसार, अभिनेता शाहरुखचे नाव श्रीमंतांच्या यादीत सर्वात वर येते. किंग खान सुमारे 5100 कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे.

● अमिताभ बच्चन : या यादीत दुसऱ्या क्रमांकावर मेगास्टार अमिताभ आहेत. बच्चन यांची प्रदीर्घ कारकीर्द आहे, जी अजूनही सुरू आहे. बच्चन यांची संपत्ती 2,950 कोटी आहे.
● सलमान खान : सलमानच्या बहुतेक चित्रपटांनी 100 कोटींच्यावर व्यवसाय केला आहे. त्यामुळेच सलमानन बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक आहे. कॅकनॉलेजच्या अहवालानुसार, सलमानची एकूण मालमत्ता 2255 कोटी रुपये आहे.
● अक्षय कुमार : अभिनेता अक्षय कुमार एका वर्षात साधारणतः चार ते पाच चित्रपट करून भरपूर पैसे कमवतो. या व्यतिरिक्त, अक्षय ब्रँड एंडोर्समेंटमधूनही भरपूर कमाई करतो. कॅकनॉलेजच्या अहवालानुसार, अक्षयची एकूण संपत्ती 2000 कोटी रुपये आहे.
● आमिर खान : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान एका वर्षात फक्त एकच चित्रपट करतो, मात्र या तो चाहत्यांची मने जिंकतो एवढं नक्की. कॅकनॉलेजच्या अहवालानुसार, आमिर त्याच्या चित्रपट आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून एकूण 1,562 कोटी रुपये कमावतो.