Take a fresh look at your lifestyle.

क्या हुआ तेरा वादा?; पुण्यात राष्ट्रवादी भाजपला करुन देणार वायद्यांची आठवण!

पुणे : आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सोशल मीडियावर भाजपला ‘क्या हुआ तेरा वादा’? असा सवाल करत त्यांच्या वायद्यांची आठवण करुन देणार आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत जगताप यांनी माहिती दिली आहे.
“पुणेकरांना मोठमोठी स्वप्ने दाखवून प्रत्यक्षात गेल्या साडेचार वर्षात पायाभूत सुविधादेखील पुरवण्यास अपयशी ठरलेल्या भारतीय जनता पक्षाला आम्ही त्यांनी केलेल्या वायद्यांची आठवण म्हणून प्रश्न विचारणार आहोत, असं प्रशांत जगताप यांनी सांगितलं.
दरम्यान, त्यासाठी आम्ही समाजमाध्यमांच्या माध्यमातून ‘क्या हुवा तेरा वादा’ ही प्रश्नमालिका सुरु करत असून या माध्यमातून भाजपच्या अपयशाचा पाढा वाचणार आहोत, अशी माहिती प्रशांत जगताप यांनी दिली आहे.