Take a fresh look at your lifestyle.

आता 40 मिनिटांतच पुणे – मुंबई प्रवास !

सोयीस्कर पर्याय तोही अगदी माफक दरात !

 

पुणे : पुणे – मुंबई प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पुणे विमानतळावरील धावपट्टीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे पुणे लोहगाव विमानतळ पंधरा दिवसांसाठी बंद राहणार आहे. येत्या 16 ते 29 ऑक्टोबरपर्यंत विमानतळ बंद ठेवण्यात येणार आहे.  विमानसेवा बंद झाल्यामुळे आता सणासुदीच्या काळात खाजगी हवाई सेवा  सुरू करण्याची योजना आखली जात आहे. खाजगी हेलिकॉप्टर Fly Blade India Pvt Ltd. द्वारे ही सेवा सुरु झाली आहे. यामुळे जवळपास 40 मिनिटांत पुणे ते मुंबई असा प्रवास करता येणार आहे.
ही हेलिकॉप्टर सेवा दररोज खराडी ते जुहू अशी सुरू असेल. पुणे ते मुंबईसाठीचं एका व्यक्तीचं तिकीट 1500 रुपये असेल. हेलिकॉप्टर दररोज सकाळी 9.30 वाजता खराडी आणि जुहूतून संध्याकाळी 4.30 वाजता निघेल. पुणे ते मुंबई दरम्यान Blade ही एकमेव खाजगी हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यात येत आहे. या हेलिकॉप्टर सेवेमुळे पुणे-मुंबई दरम्यान रस्ते प्रवासासाठी लागणारे पाच तास वाचतील. विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिंया यांनी मागील आठवड्यात पुण्यासाठी हेलिकॉप्टर सेवा घोषित केली होती.
विमान वाहतूक मंत्र्यांच्या घोषणेनंतर प्रायव्हेट हेलिकॉप्टर कंपनी Blade India Pvt Ltd. ने पुणे-मुंबई सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे.सध्या पुणे आणि मुंबई दरम्यान कोणतीही व्यावसायिक उड्डाणं सुरू नाहीत. त्यामुळे हेलिकॉप्टर सेवा एकमेव हवाई पर्याय आहे.
विमानाशिवाय आता जलद प्रवासासाठी हा एक सोयीस्कर पर्याय उपलब्ध झाला आहे. एव्हिएशन विश्लेषक आणि एयर इंडिया पुणे स्टेशनचे माजी प्रभारी धैर्यशील वंदेकर यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं, की हा प्रवाशांसाठी एक चांगला पर्याय ठरेल.पुणे आणि मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. त्यामुळे अनेक व्यावसायिकांसह इतर प्रवाशांसाठीही ही सेवा फायदेशीर ठरेल. यामुळे अनेकांचा मोठ्या प्रमाणात वेळही वाचेल.