Take a fresh look at your lifestyle.

‘ओके’ चा खरा अर्थ माहिती आहे का?

का म्हणतात बर OK ?

 

दिवसभरात विविध कामाच्या निमित्ताने आपण ‘ओके’ शब्द अनेकदा वापरतो. मात्र OK चा फुलफॉर्म तुम्हाला माहिती आहे का? नाही ना? याबाबतच जाणून घेऊयात…
अनेकांना वाटते OK चा फुल फॉर्म हा Oll Korrect असा आहे; मात्र ते खरं नाही. त्याचा फुल फॉर्म हा खरंतर Olla Kolla असा आहे. हा एक ग्रीक शब्द आहे, ज्याचा अर्थ होतो की ‘सगळं ठीक आहे.’
साधारणतः 182 वर्षांपूर्वी अमेरिकन पत्रकार चार्ल्स गॉर्डन ग्रीन यांच्या लेखणीतून सर्वात अगोदर OK हा शब्द जगासमोर आला होता. 1839 मध्ये कित्येक लेखकांनी बऱ्याच इंग्रजी शब्दांची संक्षिप्त रूपं म्हणून वापरण्यास सुरुवात केली. आता जसे आपण LOL, ROFL, DND असे शॉर्टफॉर्म वापरतो, अगदी तसंच.
त्यावेळी Oll Korrect म्हणून OK चा वापर केला गेला होता. चार्ल्स गॉर्डन यांनी इंग्रजीतल्या व्याकरणावर बोस्टन मॉर्निंग पोस्टमध्ये एक कडक लेख लिहिला होता. या लेखात ग्रीन यांनी OK सोबतच OW असाही शॉर्टफॉर्म वापरला होता. ‘ऑल राईट’ लिहिण्यासाठी त्यांनी हा शॉर्टफॉर्म वापरला होता.
‘हफपोस्ट’ने प्रसिद्ध केलेल्या एका रिपोर्टमध्ये मात्र वेगळीच माहिती होती. या अहवालानुसार, ओके हा शब्द खरंतर Okeh या शब्दापासून आलाय. अमेरिकेतल्या मूळनिवासी असलेल्या चॉक्टॉ जातीमध्ये हा शब्द वापरला जात होता. स्मिथसोनियन पत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या एका लेखामध्ये दिलेल्या माहितीनुसार, OK हा शब्दच चुकीचा असल्याचे सांगितले होते.
AC (All Correct) ऐवजी लोक चुकून OK वापरू लागल्याचं यात म्हटलं होतं. यासोबतच OK शब्दामागे आणखी मजेशीर इतिहास आहे. 1840मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मार्टिन बॅन ब्यूरन यांच्या प्रचार यात्रेमध्ये OK शब्दाला निवडणूक घोषणेच्या रूपानं वापरण्यात आलं होतं. वॅन ब्यूरन यांचं टोपणनाव ‘ओल्ड किंडरहुक’ असं होतं.
याचा शॉर्टफॉर्म OK होत असल्यामुळे लोक प्रचारासाठी त्याचा वापर करू लागले. त्यावेळी देशभरात ‘ओके क्लब’ही सुरू केले गेले होते. सुरुवात कुठूनही झाली असली, तरी सध्या ओके हा शब्द मोठ्या प्रमाणात वापरला जातोय एवढं नक्की.