Take a fresh look at your lifestyle.

संगणकाचा अतिवापर होतोय ?

अशी घ्या डोळ्यांची काळजी!

 

हल्लीची पिढी दिवसभर संगणकासमोर काम करत असते. यामुळे नकळत डोळ्यांची उघडझाप करण्याचे प्रमाण कमी होते. सहाणे डोळ्यांतील अश्रुपटल कोरडे होऊन डोळ्यांत कोरडेपणा जाणवतो.
संगणकाच्या अतिवापराने अश्रुपटल कोरडे होण्यासोबतच एका विशिष्ट अंतरावर सातत्याने नजर केंद्रित केल्याने डोळ्यांमधील बाहुलीचे स्नायू थकतात. यावर काही उपाय आहेत. ते पाहूयात…
● दोन-तीन तासांहून अधिक काळ संगणकासमोर बसणाऱ्यांनी दर २०-३० मिनिटांनंतर चार-पाच मिनिटे डोळे बंद करून विश्रांती घ्यावी.
● जर हे शक्य नसेल तर कार्यालयाच्या खिडकीमधून लांबवर पहा. या काळात मोबाईल किंवा अन्य गॅझेटस पाहू नका.
● काम करत असताना जाणीवपूर्वक डोळ्यांची उघडझाप करा. काम करण्याच्या ठिकाणी वातानुकूलित वातावरण असल्यास एसीचा झोत थेट चेहऱ्यावर येणार नाही याची देखील काळजी घ्या.
● मोबाईल किंवा संगणकाची स्क्रीन आणि डोळे यांमध्ये अंतर ठेवून शक्यतो काम करा. हे अंतर काही वेळाने बदलत रहा. जेणेकरून डोळ्यांवर कमी ताण येईल.
● संगणकाचा वापर करताना शक्यतो त्या रूममध्ये लाईट्स चालू असतील याची खात्री करून घ्या. अंधारात संगणक वापरू नका.