Take a fresh look at your lifestyle.

आता येणार कोरोना प्रतिबंधक गोळी !

लसीकरणाला नवा पर्याय ठरणार ?

 

नवी दिल्ली : औषध निर्मिती क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी मर्क अमेरिकन अँड ॲडमिनीस्ट्रेशन म्हणजे एफडीए ड्रग कडे कोविड १९ प्रतिबंधक औषधाला मंजुरी मिळावी यासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यानुसार या औषधाला मंजुरी मिळाली तर कोरोनापासून बचाव करणारे हे पहिले औषध असेल.संदर्भातला निर्णय एफडीआय लवकरच देणार असल्याचे समजते.
आत्तापर्यंत एफडीआयने कोरोना संक्रमण विरोधातील ज्या ज्या उपचारांना परवानगी दिली आहे त्यात इंजेक्शन घेणे हाच उपाय आहे. पण हे नवे औषध गोळी म्हणजे टॅब्लेट स्वरुपात असून कोरोना संक्रमण होते आहे असे वाटले तर घराच्याघरीच ही गोळी घेता येणार आहे.
या नव्या औषधामुळे अमेरिकेतील रुग्णालयांवर येत असलेला ताण कमी होईल असा दावा केला जात आहे. त्याचबरोबर जेथे आरोग्य सेवा अगदी कमकुवत आहेत अशा गरीब देशांना सुद्धा कोरोना
विरोधी युद्धात ही गोळी महत्वाची कामगिरी बजावू शकेल असे सांगितले जात आहे. अमेरिकन एफडीए कडून या औषधाची सुरक्षितता आणि प्रभाव यांची आकडेवारी तपासली जात आहे.
या संदर्भात मर्क आणि रिजेबॅक बायोथेरेपिक तर्फे एक पत्रक जारी केले गेले आहे. त्यानुसार कोविडच्या प्राथमिक ते मध्यम प्रकारच्या लक्षणात ही गोळी वयस्क नागरिकांवर वापरण्यास आपत्कालीन मंजुरी एफडीए कडे मागितली गेली आहे. या लोकांत कोविड संक्रमण झाल्यास हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची जोखीम जास्त आहे. सध्या तरी कोविड पासून बचावासाठी लसीकरण हाच एक पर्याय आहे.